शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठरलं! शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 'या' दिवशी होणार

By संदीप आडनाईक | Updated: March 17, 2023 18:49 IST

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यामुळे आणि शिक्षकेतर संघटनेच्या संपामुळे दीक्षांत समारंभ लांबणीवर

कोल्हापूर : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यामुळे आणि शिक्षकेतर संघटनेच्या संपामुळे लांबणीवर पडलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला कुलपती कार्यालयाने हिरवा झेंडा दाखविला. नवे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली हा ५९ वा दीक्षांत समारंभ सोहळा २९ मार्चला होणार आहे. यासंदर्भातील पत्रव्यवहाराला कुलपती कार्यालयांकडून मंजुरी मिळाली असून तसे पत्र विद्यापीठ प्रशासनाला मिळालेले आहे.विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १६ फेब्रुवारीला होणार होता. यासाठी इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. हेच पाहुणे २९ मार्च रोजीच्या दीक्षांत समारंभासाठी उपस्थित असतील.विद्यापीठातील ६६ हजार ४५७ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या प्रमाणपत्रांची छपाईही पूर्ण झाली होती. नवे राज्यपाल रमेश बैस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दीक्षांत समारंभाची नवी तारीख मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कुलपती कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. शिवाजी विद्यापीठात आता या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकांची छपाई, कार्यक्रमाची रूपरेषा आणि ग्रंथमहोत्सवाची तयारी याची कामे सुरू झाली आहेत. दीक्षांत समारंभासाठी घालण्यात आलेला मंडप अद्यापही काढलेला नाही. याशिवाय रस्ता दुरुस्तीचेही काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ