शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

सभेपूर्वीच शिक्षक बॅंकेत वादाचे फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST

कोल्हापूर: प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन पद्धतीने उद्या, शनिवारी दुपारी १ वाजता न्यू शाहूपुरीतील हॉटेलमध्ये होत आहे. निवडणुका ...

कोल्हापूर: प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन पद्धतीने उद्या, शनिवारी दुपारी १ वाजता न्यू शाहूपुरीतील हॉटेलमध्ये होत आहे. निवडणुका ताेंडावर असल्याच्या पार्श्वभूमीवर ही वार्षिक सभा होत असल्याने सत्ताधारी सावध, तर विरोधक आक्रमक झाले आहेत. सभा शनिवारी होणार असली तरी सभेची माहिती देण्यासाठी गुरुवारी बॅंकेत बोलावण्यात आलेल्या बैठकीतच सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली. ऑनलाईन सभेत मंजूर-नामंजूर आकडेवारी पारदर्शक पद्धतीने देण्याच्या मागणीवरून विरोधी संचालक लक्ष्मी पाटील आणि माजी अध्यक्ष संभाजी बापट यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

गुरुवारी बॅंकेचे अध्यक्ष आण्णासो शिरगावे यांनी पत्रकार बैठक घेऊन सभेची व बॅंकेच्या ताळेबंदाची माहिती दिली. याला लगेचच विरोधी आघाडी असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रविकुमार पाटील, लक्ष्मी पाटील यांच्यासह शिक्षकांनी स्वतंत्र बैठक घेऊन सत्ताधाऱ्यांनी खोटा ताळेबंद मांडून बोगस नफा दाखवल्याचे आकडेच जाहीर केले. विद्यमान संचालक मंडळाची ही शेवटचीच सभा असल्याने ती वादळी होणार अशी शिक्षक वर्तुळात चर्चा आहे, त्याची सुरुवात गुरुवापासूनच झाल्याने आगामी निवडणुकीची झलकच दिसली आहे.

नऊ टक्के लाभांश देणार : आण्णासो शिरगावे, अध्यक्ष शिक्षक बॅंक

कोल्हापूर: प्राथमिक शिक्षक बॅंक यावर्षी सभासदांना ९ टक्के लाभांश देणार आहे, याशिवाय ठेवीवरील व्याजदरातही एक टक्का वाढवून दिला जाणार आहे, तसा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार असल्याचे शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष आण्णासो शिरगावे यांनी सांगितले.

शिरगावे म्हणाले, बॅंकेने चालू आर्थिक वर्षात ६०४ कोटी २९ लाखांंचा व्यवसाय केला असून २ कोटी ६० लाख ७२ हजारांचा नफा मिळवला आहे. थकबाकीचा आकडा मात्र १.३४ टक्केवर गेला असून अजूनही ३ कोटी ४४ लाख हजाराची कर्जे थकलेली आहेत. यात १९८८ पासूनच्या जुन्या १५ कर्जदारांकडे १ कोटी १४ लाखांची थकबाकी अडकून पडली आहे. कारभार पारदर्शक व सर्वसमावेशकच करण्याचे काम आजपर्यंत केले असल्याने आतापर्यंत विरोधकांनाही फारसा आक्षेप घेता आला नसल्याचेही शिरगावे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष बाजीराव कांबळे, प्रशांतकुमार पोतदार, नामदेव रेपे, राजमोहन पाटील, बजरंग लगारे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

सोने तारण कर्जात सत्ताधाऱ्यांचा हात : प्राथमिक शिक्षक संघाचा आरोप

कोल्हापूर : शिक्षक बॅंकेत सत्ताधाऱ्यांनी गैरकारभाराचा सपाटाच लावला आहे, त्याचा उद्या,शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत जाब विचारला जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षक संघाने पत्रकार बैठक घेऊन जाहीर केले. रविकुमार पाटील, लक्ष्मी पाटील यांच्यासह शिक्षकांनी घेतलेल्या या बैठकीत भ्रष्ट कारभाराचे पुरावेच देण्यात आले. सोने तारण कर्जात सत्ताधाऱ्यांचा हात मारल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

पत्रकार परिषदेस आनंदराव जाधव, एस.व्ही.पाटील, सुरेश कांबळे, रघुनाथ खोत, सुनील पाटील, बाळासाहेब निंबाळकर उपस्थित होते.

यात ते म्हणतात, एकाचेही लसीकरण झाले नसताना ‘गोकुळ’ची निवडणूक सहकार विभाग घेते, मग शंभर टक्के लसीकरण होऊन देखील शिक्षक बॅंकेची निवडणूक का पुढे ढकलली जात आहे. एकाच महिन्यात बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मलकापूर व शिरोळचे शाखाधिकारी अशा तिघांनी राजीनामे का दिले, बोगस सोने तारण कर्ज प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा सरळ हात आहे. आरबीआयची मंजुरी नसतानाही लाभांशाचे वाटप का, बॅंक ४ कोटींनी तोट्यात असताना २ कोटींचा नफा कसा दाखवला. राजाराम वरुटे अध्यक्ष असताना घेतलेल्या १० लाखांच्या कर्जापैकी अजूनही ५ लाख ५४ हजार कर्ज अजूनही थकीत कसे, शिरोळ पूरबुडीत असताना डाटा एन्ट्रीची यंत्रणा तेथे कशी, बजरंग लगारे निवृत्त होऊन चार वर्षे होऊन संचालक कसे अशा प्रश्नांच्या उत्तरांची मागणी केली आहे.