सांगली, जळगावच्या विजयामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नियोजनाचा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:51 PM2018-08-04T12:51:42+5:302018-08-04T12:56:39+5:30

गेल्या २५ वर्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेद्वार निवडण्यापासून प्रचारापर्यंतची पश्चिम महाराष्ट्राची सर्व जबाबदारी नेहमी चंद्रकांत पाटील यांच्यावर असते; त्यामुळेच सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे नियोजन करताना त्यांना फारशी अडचण आली नाही. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जळगावमध्ये केलेले काम, तेथील पूर्वाश्रमीचे संबंध आणि आता पालकमंत्री म्हणून असलेले पद हे जळगावच्या विजयाला हातभार लावणारे ठरले आहे.

The contribution of Chandrakant Patil in the victory of Sangli, Jalgaon | सांगली, जळगावच्या विजयामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नियोजनाचा वाटा

सांगली, जळगावच्या विजयामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नियोजनाचा वाटा

Next
ठळक मुद्देमहापालिकेच्या विजयामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नियोजनाचा वाटासांगली, जळगावमध्येही पूर्वाश्रमीचे संबंध आले कामी

कोल्हापूर : गेल्या २५ वर्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेद्वार निवडण्यापासून प्रचारापर्यंतची पश्चिम महाराष्ट्राची सर्व जबाबदारी नेहमी चंद्रकांत पाटील यांच्यावर असते; त्यामुळेच सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे नियोजन करताना त्यांना फारशी अडचण आली नाही. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जळगावमध्ये केलेले काम, तेथील पूर्वाश्रमीचे संबंध आणि आता पालकमंत्री म्हणून असलेले पद हे जळगावच्या विजयाला हातभार लावणारे ठरले आहे.

जळगावमध्ये अभाविपचे काम करताना चंद्रकांत पाटील यांनी मजबूत बांधणी केली होती; त्यामुळेच काही वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मी जळगावमध्ये जो उभा आहे, तो दादा पाटील यांनी केलेल्या संघटनात्मक बांधणीच्या जोरावर, असे उद्गार काढले होते. हेच पूर्वाश्रमीचे संबंध आणि आता पालकमंत्री म्हणून पेललेली तेथील जबाबदारी यामुळे जळगाव महापालिका ताब्यात येण्यास पूरक ठरली आहे.

सांगली महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेले वर्षभर चंद्रकांत पाटील यांनी नियोजन सुरू केले होते. प्रत्येक आठवड्याला कोल्हापूरबरोबरच त्यांचा सांगली दौरा ठरला होता. सुरुवातीला सांगलीचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुधीर खाडे, प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे यांच्याशी चंद्रकांत पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांचे संबंध; त्यामुळे या सर्वांना सोबत घेऊन सांगलीकरांसाठी नेमकं काय करायला पाहिजे, विरोधकांचे कच्चे दुवे काय आहेत. या सगळ्यांवर गेल्या वर्षभरात मंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू होते. निवडणुकीच्या आधी पंधरा दिवस तर पाटील यांनी कोल्हापूरपेक्षा पूर्ण वेळ सांगलीला दिला होता. उमेद्वार निवडीमध्ये स्थानिक नेत्यांना मताला महत्त्व देण्याची त्यांची नेहमीच भूमिका असते. आपली माणसे घुसडण्यापेक्षा विजयाची क्षमता असणाऱ्यांना प्राधान्य देत त्यांनी ही जोडणी घातली.
प्रचारासाठी राज्यस्तरीय नेते आणण्यातही मंत्री पाटील कुठेही कमी पडले नाहीत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली दौरा रद्द झाला. तरीही व्हिडीओ क्लीपद्वारे मतदारांना संदेश दिला गेला आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे वसंतदादा पाटील यांच्या सांगलीमध्ये कमळ फुलून आले.
..............................
खंबीरपणे पाठीशी
एखाद्या निवडणुकीत भाजपने उतरायचे ठरवल्यानंतर मग सर्व आघाड्यांवर आपण पुढेच असले पाहिजे, अशी चंद्रकांत पाटील यांची भूमिका असते. आज राज्याच्या सत्तेतील क्रमांक दोनच्या पदावर असलेल्या मंत्री पाटील यांनी सांगली महापालिका ही प्रतिष्ठेची केली. कोल्हापूर महापालिकेतील त्यांचा विजय थोडक्यात हुकला होता. ते भरून काढताना त्यांनी सर्व नेत्यांना एकत्र करत त्यांच्यात समन्वय ठेवत, त्यांना सर्व पातळ्यांवर कृतिशील पाठिंबा दिला. निवडणूक निधीपासून ते प्रचाराला नेते आणण्यापर्यंत सर्व बाजूंनी ‘दादा’ आपल्याबरोबर आहेत म्हणजे काळजी नाही, असा विश्वास नेत्यांना देण्यात मंत्री पाटील यशस्वी ठरले. परिणामी स्थानिक नेते आणि कार्यक र्त्यांनी झोकून देऊन काम केले.

 

Web Title: The contribution of Chandrakant Patil in the victory of Sangli, Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.