शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरची मोटारसायकलीस धडक, महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

: निपाणी देवगड राज्य महामार्गावरील सोळांकुर (ता. राधानगरी) येथे पाईप घेऊन चाललेल्या कंटेनरची मोटारसायकलीस धडक बसल्याने ट्रकखाली चिरडून ...

: निपाणी देवगड राज्य महामार्गावरील सोळांकुर (ता. राधानगरी) येथे पाईप घेऊन चाललेल्या कंटेनरची मोटारसायकलीस धडक बसल्याने ट्रकखाली चिरडून शारदा शंकर पाटील (वय ५५, रा. सोळांकुर) यांचा मृत्यू झाला. मोटारसायकलस्वार शंकर शामराव पाटील हे जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे. घटनेनंतर हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. तब्बल सहा तास रास्ता रोको करण्यात आला.

गावातील मुख्य रस्त्याचे काम अनेक वर्षे रखडले असून, ते त्वरित होण्यासाठी तसेच थेट पाईपलाईन गावाच्या बाहेरून डोंगरातून जाण्यासाठी ग्रामस्थांनी हा रास्ता रोको केला. शनिवारी सकाळी साडेअकराच्यासुमारास शारदा पाटील व पती निवृत्त वनक्षेत्रपाल शंकर पाटील हे दोघे मोटारसायकलीवरून मोघर्डे ओढ्याजवळ तांबर शेताकडे जात होते. ग्रामपंचायत सांस्कृतिक सभागृहासमोर मोटारसायकलीला पाईपलाईनची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने ठोकल्याने त्या रस्त्यावर पडल्या. कटेनरचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर चालक पळून गेला. पाटील यांच्या पाठीमागे पती, विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे. पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

निपाणी-देवगड रस्त्यावरील गावातील मुख्य रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो . धुळीचा मोठया प्रमाणात त्रास होतो. या रस्त्याच्या कामासाठी अनेक आंदोलने झाली तरीही ठेकेदाराने कामाकडे दुर्लक्ष केले आहे. लोकांनी निपाणी-देवगड रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून रास्ता रोको केला. थेट पाईपची जलवाहिनी गावाच्या बाहेरून घ्यावी तसेच मुख्य रस्त्याचे काम ताबडतोब सुरू करावे, या मागणीसाठी सुमारे सहा तास रस्ता अडविण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, थेट पाईप व रस्त्याचे ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली. पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, तहसीलदार मीना निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अमित पाटील, महानगरपालिकेचे जल अभियंता हर्षजित घाडगे घटनास्थळी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. दोन लाखांची मदत संबंधित कंपनीने देण्याचे जाहीर केल्याचे आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

फोटो: ०३शारदा पाटील

०३ सोळांकुर घेराव

फोटो - सोळांकुर येथे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी तसेच रस्त्याचे काम त्वरित व्हावे व थेट पाईपलाईन गावाबाहेरून घ्यावी, या मागणीसाठी अधिकाऱ्यांना घातलेला घेराव.