करुळ घाटात कंटेनरला अपघात, दरीत कोसळता कोसळता बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:17 IST2019-08-31T12:54:10+5:302019-08-31T13:17:13+5:30
करुळ घाटात शनिवारी सकाळी कंटेनरला अपघात झाला. या अपघातात कंटेनर दरीवरील संरक्षक कठड्याला अडकून राहिला. कंटेनर दरीत कोसळता कोसळता बचावला आहे. तर चालक या अपघातातुन बचावला आहे.

करुळ घाटात कंटेनरला अपघात, दरीत कोसळता कोसळता बचावला
गगनबावडा : करुळ घाटात शनिवारी सकाळी कंटेनरला अपघात झाला. या अपघातात कंटेनर दरीवरील संरक्षक कठड्याला अडकून राहिला. कंटेनर दरीत कोसळता कोसळता बचावला आहे. तर चालक या अपघातातुन बचावला आहे.
करुळ चेकपोस्टवर ड्युटीला असलेले पोलीस संदिप राठोड यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत इतर वाहन चालकांच्या मदतीने अपघातात अडकलेल्या चालकाला बाहेर काढले.
चालक या अपघातामुळे घाबरला असून त्याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ वैभववाडी रुग्णालयात हलविले आहे.
कंटेनरमध्ये काय आहे हे समजू शकले नाही. कंटेनर (नं एचआर 55-ट- 5949) पुण्याहून गोव्याकडे जात होता. अपघातस्थळी पो. नि. दत्तात्रय बाकारे व पोलीस दाखल झाले आहेत.