Kolhapur: पन्हाळगडावर उत्खनन करणे पडले भारी, बांधकाम व्यावसायिकाला ५७ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:56 IST2025-06-20T17:56:31+5:302025-06-20T17:56:55+5:30

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावर प्रवासी कर नाक्याच्या दक्षिणेस पुरातन हरिहरेश्वर मंदिर, नागझरीच्या परिसरात चालू असलेल्या उत्खननाबाबत महसूल प्रशासनाने तत्काळ ...

Construction worker fined Rs 57 lakh for excavating at Panhalgad | Kolhapur: पन्हाळगडावर उत्खनन करणे पडले भारी, बांधकाम व्यावसायिकाला ५७ लाखांचा दंड

संग्रहित छाया

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावर प्रवासी कर नाक्याच्या दक्षिणेस पुरातन हरिहरेश्वर मंदिर, नागझरीच्या परिसरात चालू असलेल्या उत्खननाबाबत महसूल प्रशासनाने तत्काळ कारवाई केली आहे. उत्खननाचा पंचनामा करून ते उत्खनन अनधिकृत ठरवत पन्हाळा तहसीलदारांनी उत्खनन करणाऱ्या सतीश भोसले यांना ५७ लाखांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.

पन्हाळगडावरील नागझरी या ठिकाण नजीकची बांधकाम व्यावसायिक सतीश भोसले यांनी जमीन खरेदी केली आहे. भोसले यांनी खरेदी केलेली जमीन उताराची असल्याने त्यांनी बांधकाम करण्यासाठी तेथे उत्खनन करून जमीन सपाटीकरण केले आहे. या उत्खनामुळे पौराणिक महात्म्य लाभलेल्या नागझरी शेजारी मोठ्या दगड मातीचा भराव काढून मोठा खड्डा निर्माण झाला आहे. 

पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचून नागझरी, हरिहरेश्वर मंदिर तसेच लगतच्या घरांना भुस्खलनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याची तत्काळ दाखल घेत महसूल प्रशासनाने उत्खनन झालेल्या ठिकाणी पंचनामा केला. पंचनाम्यानंतर केलेल्या चौकशीअंती ते उत्खनन अनधिकृत ठरवले. त्यानुसार पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांनी बांधकाम व्यावसायिक सतीश भोसले यांना ५७ लाख १५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावत लेखी खुलासा मागितला आहे.

Web Title: Construction worker fined Rs 57 lakh for excavating at Panhalgad