शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
2
कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट?
3
आईच्या पिंडदानाची तयारी सुरू होती, तेवढ्यात फोन खणखणला अन्...; असं काही घडलं की सगळेच झाले हैराण!
4
Wife सोबत मिळून पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
5
इराणच्या खामेनी विरोधात बंड पुकारणं पडणार महागात! 'या' २६ वर्षीय तरुणाला दिली जाणार फाशी?
6
टॅरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
7
११ वर्षांनी अद्भूत योगात मकरसंक्रांती २०२६: संक्रमण पुण्य काल कधी? पाहा, महत्त्व-मान्यता
8
चांदीची ऐतिहासिक भरारी! २.६८ लाखांचा टप्पा पार; आता ३ लाखांचे लक्ष्य? खरेदीची संधी की नफावसुलीची वेळ?
9
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
10
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
11
PNB मध्ये जमा करा ₹२,००,०००, मिळेल ₹८१,५६८ चं फिक्स व्याज; जाणून घ्या संपूर्ण स्कीम
12
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
13
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
14
प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'
15
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
16
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
17
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
18
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
19
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
20
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कन्व्हेन्शन सेंटरच्या बांधकाम, वृक्षतोडीला स्थगिती; सर्किट बेंचचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:02 IST

पुढील सुनावणी १८ डिसेंबरला

कोल्हापूर : राजाराम तलाव येथे बांधण्यात येत असलेल्या कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम व वृक्षतोड तातडीने थांबवण्याचा आदेश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित बी. कडेठाणकर यांनी दिला. येथील वृक्षताेडीविरोधात परिसरातील वृक्षप्रेमी व सामाजिक संघटनांनी याचिका दाखल केली होती. पुढील सुनावणी १८ डिसेंबरला आहे.राजाराम तलाव येथे कन्व्हेन्शन सेंटर उभारले जात असून त्यासाठी याआधीच अनेक झाडे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली आहे. उर्वरित ११५ झाडे तोडण्यासाठी महापालिकेने १६ सप्टेंबरला नोटीस प्रसिद्ध करून हरकती मागवल्या होत्या. त्यावर वृक्षप्रेमींनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवून वृक्षतोडीला विरोध केला होता. मात्र त्यावर महापालिकेने कार्यवाही न केल्याने वृक्षप्रेमी व सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. तसेच आधी झालेल्या वृक्षतोडीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.मात्र त्यांच्याकडूनही या मागणीवर फारसा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने वृक्षप्रेमी श्रीराम कोगनोळीकर यांनी सर्किट बेंच येथे याचिका दाखल केली. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. त्यावर न्यायमूर्तींनी आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरचे सुरू असलेले बांधकाम आणि येथील अनधिकृत वृक्षतोड तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले.त्यांच्या आदेशात याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी माहिती अधिकार कायद्यानुसार मिळालेल्या माहितीवरील नोंदी दाखवल्या आहेत, त्यानुसार उद्यान विभाग व सार्वजनिक माहिती अधिकार अधिकाऱ्यांनी वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. निरीक्षण अहवालानुसार अंदाजे ५०० झाडे माती भरावामुळे बाधित झाली असल्याचे नमूद आहे, असे निरीक्षण नोंदवत त्यांनी पुढील आदेशापर्यंत झाडे तोडण्यास मनाई केली आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. राहुल वाळवेकर यांनी काम पाहिले, अशी माहिती मराठा रियासत फौंडेशनचे प्रसाद मोहिते, सौरभ पाेवार यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Convention Center Construction, Tree Felling Halted by Court

Web Summary : High Court halts Kolhapur convention center construction and tree felling following petition by environmentalists. No permission granted for tree cutting. Next hearing December 18th.