इचलकरंजीत १५० ठिकाणी कचऱ्याच्या पेट्यांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:10 PM2017-12-13T23:10:04+5:302017-12-13T23:13:40+5:30

इचलकरंजी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र पेट्या बसविण्यास नगरपालिकेने सुरुवात केली आहे.

 Construction of garbage boxes in Ichalkaranji 150 places | इचलकरंजीत १५० ठिकाणी कचऱ्याच्या पेट्यांची उभारणी

इचलकरंजीत १५० ठिकाणी कचऱ्याच्या पेट्यांची उभारणी

googlenewsNext
ठळक मुद्देनगरसेवकांत मात्र स्वच्छतेबाबत उदासिनताओल्या-सुक्या कचऱ्याच्या पेट्या ठरताहेत लक्षवेधीपालिकेकडून ३९ लाख रुपये खर्च

इचलकरंजी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र पेट्या बसविण्यास नगरपालिकेने सुरुवात केली आहे. नगरपालिकेकडील आरोग्य व स्वच्छता विभागाने ३९ लाख रुपये खर्च करून १५० पेट्यांच्या या जोड्या प्रमुख रस्त्यांवर बसविल्या जात आहेत. रस्त्याच्या कडेला मोक्याच्या ठिकाणी ‘आ’ वासून लटकलेल्या या पेट्या नागरिकांना लक्षवेधी ठरत आहेत. स्वच्छतेबाबत अत्यावश्यक असलेला नगरसेवकांचा सहभाग मात्र दिसून येत नाही.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील अंतर्गत स्वच्छतेसाठी चौदाव्या वित्त आयोगातून नगरपालिकेने कचरा गोळा करणाºया ३०० पेट्या खरेदी केल्या आहेत.३८ लाख ९५ हजार रुपयांच्या या पेट्या ५० जोड्यांच्या तीन टप्प्यांमध्ये रस्त्यावर बसविण्यास सुरुवात केली आहे. सध्या स्टेशन रोड ते नदीवेस नाका व करवीर नाका ते राजवाडा चौक या प्रमुख रस्त्यांवर प्रत्येक ५०० मीटरवर कचरा पेट्या बसविल्या जात आहेत.

रस्त्याच्या कडेला, तसेच प्रमुख चौकांच्या बाजूस हिरव्या व निळ्या रंगाच्या पेट्या जमिनीमध्ये खड्डा काढून कॉँक्रिटच्या सहायाने बसविण्यास सुरुवात झाली आहे. हिरव्या पेट्यांमध्ये ओला कचरा व निळ्या पेट्यांमध्ये सुका कचरा टाकावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून नगरपालिकेने केली आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये नजरेत भरेल, अशा मोक्याच्या ठिकाणी या पेट्या लटकलेल्या अवस्थेत ‘आ’ वासून उभ्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधण्याबरोबरच एक विचित्र अनुभव देणाºया या पेट्या ठरू लागल्या असल्यामुळे शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे.

नगरपालिकेमध्ये ६२ निवडून आलेले व पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. स्वच्छता अभियानामध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांचा सहभाग मात्र दिसून येत नाही. घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकणे, नगरसेवकांनी स्वत:च्या प्रभागामध्ये कचरा स्वतंत्र ठेवण्यासाठी पेट्या देणे, गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंटमध्ये ओला कचरा साठवून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, प्रभागातील मंगल कार्यालयाकडे निर्माण होणाºया ओल्या कचºयाची योग्य विल्हेवाट लावणे, याबाबत नगरसेवक व नगरसेविकांचे सहकार्य आवश्यक असतानाही त्यांच्यामध्ये उदासिनता दिसून येत आहे.

कचºयापासून कंपोष्ट खत
१ नगरपालिकेच्यावतीने शहरातील रहिवासी व औद्योगिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये ओला व सुका कचरा स्वतंत्र साठविणे आणि तो घंटागाडीमध्ये टाकणे, याबाबतचे आवाहन करणाºया जाहिराती घर किंवा कारखान्याच्या दारावर चिकटविण्यात आल्या आहेत.
२ त्याचप्रमाणे राजीव गांधी भवन व भगतसिंग उद्यान या ठिकाणी ओल्या कचºयापासून कंपोस्ट खतनिर्मिती करण्याचे काम नगरपालिका करीत आहे. अशा प्रकारची खतनिर्मिती शहरातील अन्य उद्यानांतूनसुद्धा केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांनी दिली.

Web Title:  Construction of garbage boxes in Ichalkaranji 150 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.