शिरोळमध्ये ४०० विद्युत पोलची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:26+5:302020-12-30T04:31:26+5:30

शिरोळ : शहरात नव्याने ४०० विद्युत पोल बसविण्यात येणार आहेत. सुमारे ६८ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाली ...

Construction of 400 electric poles at Shirol | शिरोळमध्ये ४०० विद्युत पोलची उभारणी

शिरोळमध्ये ४०० विद्युत पोलची उभारणी

शिरोळ : शहरात नव्याने ४०० विद्युत पोल बसविण्यात येणार आहेत. सुमारे ६८ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. शहरातील वाढीव वसाहत त्याचबरोबर ज्याठिकाणी विद्युत पोलची सुविधा नाही, अशा ठिकाणी पोल बसविण्यासाठी नगरपालिकेने सभेत ठराव केला होता. या ठरावाला तांत्रिक मंजुरी मिळाल्यामुळे पोलसह तारा व स्ट्रीट लाईट बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहराची चाळीस हजारांहून अधिक लोकसंख्या असून वाढीव वसाहतीमुळे शहराचा विस्तार वाढला आहे. वसाहतीत विद्युत पोल नसल्यामुळे पथदिव्यांची सोय त्याचबरोबर लांब अंतरावरून लाईट कनेक्शन अशी परिस्थिती आहे. नागरिकांच्या अडचणी व रस्त्यावर विद्युत पोलसह पथदिव्यांची सोय व्हावी, यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेत १ ते ८ प्रभागांमध्ये सुमारे ४०० विद्युत पोल, तारा व स्ट्रीट लाईट नव्याने बसविण्याच्या विषयाला सभेत मंजुरी दिली आहे. सुमारे ६८ कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाल्यामुळे प्रस्ताव मार्गी लागला आहे. येणाऱ्या काळात ४०० हून अधिक विद्युत पोल बसविले जाणार असून एलईडी पथदिवे बसविण्याचेही पालिकेने नियोजन केले आहे.

Web Title: Construction of 400 electric poles at Shirol