शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

स्वराभिषेकाने हृदयाच्या तारा छेडल्या

By admin | Updated: January 23, 2015 23:44 IST

कल्पना झोकरकरांचे गायन : पं सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव

कोल्हापूर : भजन, नाट्यगीतांबरोबरच राग गावती आणि केदारमधील विविध बंदिशी सादर करीत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कल्पना झोकरकर यांनी संगीतप्रेमींवर आपल्या बहारदार स्वरांचा वर्षाव केला़ येथील राम गणेश गडकरी सभागृृहात आज, शुक्रवारी सुमारे दोन तास चाललेल्या या स्वरमैफिलीने पं़ सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाची शान वाढविली़ कल्पना झोकरकर यांनी रात्रीच्या प्रहराकडे नेणाऱ्या राग ‘गावती’मधील ‘आस लागे तुम्हरे चरण’ या विलंबित तालातील बंदिशीने या स्वरमैफिलीला सुरुवात झाली़ या बंदीशीनेच उपस्थित रसिकांना त्यांच्या गायनातील उच्च दर्जाची अनुभती आली. यानंतर झोकरकर यांनी द्रु्रत त्रितालातील ‘हमरी पार करो’ ही रचना सादर केली़ समयोचित आलाप, हरकती, ताना, दमदार स्वररचना आणि संवादिनीतून हृदयाच्या तारा छेडणारे स्वर यांमुळे संगीतप्रेमी स्वरांच्या दुनियेत तल्लीन झाले होते़ यानंतर झोकरकर यांनी केदार रागातील ‘कंगणवा मोरा’ आणि ‘कान्हा रे नंदनंदन’ या बंदिशी सादर केल्या़ तसेच काफी रागातील ‘माधो मुकुंद मुरारी’ हा टप्पा पेश केला़ ‘हे सूरांनो चंद्र व्हा’ या नाट्यगीताला उपस्थितांनी भरभरून दाद दिली़ यावेळी कल्पना झोकरकर यांनी गायलेल्या बंदिशी, नाट्यगीत, भजन अशा एकपेक्षा एक रचनांच्या अखंडित स्वराभिषेकाची अनुभूतीच श्रोत्यांनी अनुभवली़ ‘भोला मन लागी’ या निर्गुणी भजनाने या सुरेल मैफिलीचा शेवट झाला़ महेश देसाई यांनी तबल्यास साथ केली. तानपुऱ्यास धनश्री फडके, राजश्री बांबुळकर यांनी, तर हार्मोनियमवर अण्णा बुगड यांनी साथ केली़ यावेळी गणेश गाडगीळ, कविता कडेकर, बाळासाहेब घाडगे, विनोद डिग्रजकर, श्रीकांत डिग्रजकर, आदी उपस्थित होते़ नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले़