शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

Kolhapur lok sabha result: छत्रपतींनाच मान, धैर्यशील यांचा विजयी बाण

By विश्वास पाटील | Updated: June 5, 2024 12:07 IST

कोल्हापुरात फिफ्टी फिफ्टी यश, सव्वीस वर्षांनंतर काँग्रेसला गुलाल

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती हे १ लाख ५४ हजार ९६४ मतांनी विजयी झाले. तब्बल २६ वर्षांनंतर काँग्रेसला या मतदारसंघात गुलाल लागला. शेवटच्या फेरीपर्यंत हृदयाचा ठोका चुकवायला लावलेल्या हातकणंगले मतदारसंघातून शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी १३ हजार ३९९ मतांनी विजयश्री खेचून आणला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्या, किंबहुना त्यांच्यामुळेच हा विजय साकारला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. कोल्हापुरात महाविकास आघाडी व महायुतीला फिफ्टी-फिफ्टी यश मिळाले.

कोल्हापुरात शाहू छत्रपती यांना ७ लाख ५४ हजार ५२२ मते मिळाली. शिंदेसेनेचे मावळते खासदार संजय मंडलिक यांना ५ लाख ९९ हजार ५५८ मते मिळाली. या मतदारसंघात तब्बल २३ उमेदवार रिंगणात होते. नोटा मतांची संख्या तिसऱ्या क्रमांकावर राहिली. हातकणंगलेमध्ये खासदार माने यांना ५ लाख २० हजार १९० मते मिळाली. उद्धवसेनेचे सत्यजित पाटील यांना ५ लाख ६ हजार ७९१ तर शेट्टी यांना १ लाख ७९ हजार ८५० मते मिळाली. वंचितच्या डी. सी. पाटील यांनीही ३२ हजार ६९६ मते घेतली. या मतदारसंघात तब्बल २७ उमेदवार रिंगणात होते. वंचितच्या उमेदवाराने गेल्या निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत सत्यजित पाटील यांनाही वंचितचा फटका बसला.

पाच मतदारसंघात छत्रपतींना मताधिक्य

  • कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच खासदार मंडलिक यांच्याविरोधात नाराजीचे वातावरण होते. त्यांनी गद्दारी केल्याचाही राग लोकांत होता. परंतु तरीही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी ताकद पणाला लावून उमेदवारी मिळवून दिली. या मतदारसंघात महायुतीकडे मातब्बर नेत्यांची फौज होती.
  • पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह तीन आमदार, भाजपचे खासदार धनंजय महाडिक असे बळ होते. त्यामुळे त्या ताकदीच्या बळावर मंडलिक विजयी होतील, असा महायुतीचा होरा होता. परंतु तो पुरता चुकला.
  • सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांनी शाहू छत्रपती यांना चांगले मताधिक्य दिले. खुद्द कागल विधानसभा मतदारसंघातही मंडलिक यांना कसेबसे १३ हजार ८५८ मताधिक्य मिळाले. त्यामुळे पहिल्या फेरीपासूनच मंडलिक मागे राहिले.

सोळाव्या फेरीनंतर धैर्यशील यांना आघाडी

हातकणंगले मतदारसंघात अत्यंत अटीतटीची लढत झाली. सुरुवातीच्या बारा फेरीपर्यंत उद्धवसेनेचे सत्यजित पाटील आघाडीवर होते. सोळाव्या फेरीनंतर हळूहळू धैर्यशील माने पुढे सरकले. त्यानंतरही मताधिक्य वर-खाली होत गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेल झाली. परंतु अखेर विजयश्री माने यांनीच खेचून आणली. माने यांच्या उमेदवारीबद्दलही सुरुवातीला नाराजी होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघात त्यांचा स्वत:चा मतदारसंघ असल्याप्रमाणे ताकद पणाला लावली. आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, माधवराव घाटगे, राजेंद्र पाटील यड्रावकर या नेत्यांना सगळी रसद पुरवून मतदारसंघाची जणू नाकाबंदीच केली. त्या तुलनेत सत्यजित पाटील यांची संघटनात्मक ताकद कमी पडली. गेल्यावळेलाही माने यांना इचलकरंजीने विजय मिळवून दिला होता. या निवडणुकीतही इचलकरंजीनेच त्यांना तब्बल ३८ हजारांवर मताधिक्य दिले. त्या तुलनेत सत्यजित पाटील यांना त्यांच्या हक्काच्या शाहूवाडी, वाळवा, इस्लामपूर मतदारसंघांनी पुरेशी ताकद दिली नाही.प्रचारातील वातावरण सत्यजित पाटील पुढे राहतील व दुसऱ्या क्रमांकासाठी धैर्यशील माने व शेट्टी यांच्यात लढत होईल, असे होते. प्रत्यक्षात शेट्टी मतांच्या पातळीवर फारच खाली राहिले. मोदी हवेत की नकोत, या लढाईत शेतकरीही माझ्यासोबत राहिला नसल्याची प्रतिक्रिया शेट्टी यांनी पराभवानंतर व्यक्त केली.

काय ठरले निर्णायककोल्हापुरात महायुतीच्या मतांच्या बेरजा कागदावरच, लोकांनी नेत्यांचे अजिबातच ऐकले नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बांधलेली मोट शाहू छत्रपती यांना विजयापर्यंत घेऊन गेली.

हातकणंगलेत मोदी फॅक्टर, विनय कोरे ठरले किंगमेकर. मतांचे धुव्रीकरण, महायुतीच्या नेत्यांची एकजूट आणि मुख्यमंत्र्यांनी लावलेली ताकद माने यांना गुलाल देऊन गेली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीdhairyasheel maneधैर्यशील माने