शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

सत्तारूढची निर्णायक बाजी

By admin | Updated: May 5, 2015 01:16 IST

‘चौंडेश्वरी’ची निवडणूक : सर्व उमेदवारांना सुमारे ३५० मताधिक्य

इचलकरंजी : येथील चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी विरोधी सुकाणू समिती पॅनेलवर विजय मिळविला. सुमारे ३५० मताधिक्याने सत्तारूढ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. देसाई यांनी निकाल घोषित केल्यानंतर सत्तारूढ पॅनेलच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली आणि विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली. साधारणत: १९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या चौंडेश्वरी सूतगिरणीचे कार्यस्थळ धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे आहे. सूतगिरणीचे २३६३ सभासद असून, संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव डाके, विद्यमान अध्यक्ष सुनील सांगले यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ पॅनेल व देवांग समाज सुकाणू समितीच्या अधिपत्याखाली रामलिंग चौंडेश्वरी पॅनेल यामध्ये सरळ लढत होती. रविवारी झालेल्या मतदानात १८१८ सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोविंदराव हायस्कूलमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली. साधारणत: अकरा वाजण्याच्या सुमारास सर्वच निकाल हाती आला. त्यामध्ये सत्तारूढ पॅनेलच्या उमेदवारांना सरासरी एक हजार, तर विरोधी सुकाणू समितीच्या उमेदवारांना सरासरी ६५० मतदान झाल्याचे आढळून आले. मतमोजणीच्या एकूण चार फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीपासूनच सत्तारूढ पॅनेलने आपली आघाडी कायम ठेवली.निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे : यंत्रमाग-हातमाग विणकर गट - विद्यमान अध्यक्ष सुनील नारायण सांगले (१०६८), श्रीकांत व्यंकटेश कबाडे (१०३०), जालंदर विठोबा दाते (१०४२), कृष्णात गणपती धुत्रे (१०४६), रवींद्र शंकर फाटक (१०४४), किशोर सदाशिव बोळाज (९७३), कृष्णात रघुनाथ भुत्ते (१०१२), मनोहर काशिनाथ भंडारे (१०३३), रामचंद्र दौलू मेटे (१०६६), शिवाजी रामचंद्र रेडेकर (१००७), कृष्णात रामचंद्र वीर (९८०), विलासराव शिवाप्पा साळमाळगे (९८१). इतर मागासवर्गीय प्रवर्ग - विद्यमान उपाध्यक्ष श्रीकांत गणपती हजारे (९७७). भटक्या विमुक्त जाती-जमाती - सुरेंद्र वीरूपाक्ष गदाळे (१०१९). अनुसूचित जाती-जमाती - डॉ. विलास शंकरराव खिलारे (१०७३). महिला राखीव - उज्ज्वला गोरखनाथ डाके (१०७५), वासंती विजय होगाडे (१०३९). पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे : आनंद तुकाराम उबाळे (६५४), शिरीष गजानन कांबळे (६६४), गजानन गुंडाप्पा खारगे (६५८), सुरेश रामचंद्र पाडळे (६३२), राजेंद्र महादेव बिद्रे (६२४), प्रमोद बाबूराव मुसळे (६५४), सुनील बापूसाहेब म्हेत्तर (६८६), रोहन महेश सातपुते (६०५), शितलकुमार मारुती सातपुते (५८७), सुरेश मुरलीधर सातपुते (५९८), शशिकांत बंडू हावळ (६८६), रघुनाथ दिनकर होगाडे (६६०), संजय महादेव कांबळे (७५१), विजय दगडू मुसळे (७५४), अरुण मारुती निंबाळकर (६९५), सुलोचना अनंत डंबाळ (६८७), मालती धोंडीराम तारळेकर (६६३). याशिवाय अपक्ष म्हणून उभे राहिलेले बाळकृष्ण महादेव ढवळे (९६), सुनील नारायण मकोटे (७८) व सुनील पांडुरंग बारवाडे (३७) अशी मते मिळाली. (प्रतिनिधी)