शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा आत्मघात

By admin | Updated: October 21, 2014 00:20 IST

काँग्रेसला शहाणपण सुचलेले नाही

भारत चव्हाण - कोल्हापूर  --कित्येकदा शेवटच्या क्षणी होणाऱ्या दगाबाजीचा फटका बसला तरीही काँग्रेसला शहाणपण सुचलेले नाही. बदला घेण्याची जुनी पद्धत नेत्यांच्या मनात आजही नव्याने घर करून राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली. एकेकाळी काँग्रेसच्या प्रभावाखाली असलेल्या जिल्ह्यातील नेत्यांना आता ‘कुठे आहे जिल्हा माझा’ अशी म्हणायची वेळ आली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात काँग्रेस राहणार काय? असा प्रश्न निर्माण झाला असताना पी. एन. पाटलांनी काँग्रेसला सावरले; परंतु दुसऱ्या बाजूने पक्षात राहून पक्षाच्या विरोधात कृत्य करणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. महादेवराव महाडिक-सतेज पाटील, पी. एन. पाटील-प्रकाश आवाडे, आवाडे-आवळे असे एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करणारे गट सक्रिय राहिले. महाडिक-सतेज पाटील यांच्यातील वादाने तर काँग्रेसचे खूपच नुकसान झाले. त्यांच्यातील वादाने कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण अशा दोन जागा गमवाव्या लागल्या. अशीच स्थिती काहीशी ‘राधानगरी’मधून झाली. राधानगरी की भुदरगड या वादात काँग्रेसचे स्थानिक नेते पडले. त्यातूनच मग वैयक्तिक हेवे-दावे सुरू झाले. राधानगरीतील नेते, कार्यकर्ते प्रचार करणार नव्हते. त्यामुळे बजरंग देसार्इंना उमेदवारी दिल्यानंतरही त्यांना माघार घ्यावी लागली. इथे काँग्रेसच्या पराभूत मनोवृत्तीचे दर्शन झाले. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसला संधी असताना सत्यजित कदम यांना धडा शिकविण्यासाठी कार्यकर्त्यांत चढाओढ झाली. काँग्रेस काही पदाधिकारी शिवसेनेच्या प्रचारात होते. ‘दक्षिण’मधून सतेज पाटील यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांनी सुपारी घेतली. इचलकरंजीत प्रकाश आवाडे यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातीलच बारा नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराला मदत केली. शिरोळमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचा प्रचार करीत राहिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वचपा काढण्याच्या नादात काँग्रेसने आपल्याच पायावर दगड मारून घेतला. करवीर व हातकणंगले येथे उमेदवारांना अतिआत्मविश्वास नडला. काँग्रेसने स्वत:चा आत्मघात करून घेतला. जिल्ह्यात सक्षम नेतृत्व नसल्यानेच हे सगळे घडले. काँग्रेसनेच काँग्रेसचा पराभव केला हे नक्की !