शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेसचे आणखी १४ उमेदवार जाहीर, महायुतीमध्ये अजूनही पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:54 IST

महायुतीमधील काही जागांचा तिढा अजूनही सुटला नाही

कोल्हापूर : एकीकडे महायुतीमधील काही जागांचा तिढा अजूनही सुटला नसताना दुसरीकडे काँग्रेसने १४ उमेदवारांची दुसरी यादी रविवारी रात्री उशिरा जाहीर केली. महायुतीच्या जरी दिवसभर मॅरेथॉन बैठका झाल्या असल्या तरीही त्यांना अंतिम निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे आता यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हस्तक्षेप करावा लागणार आहे.महायुतीच्या उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये जनसुराज्यला फारशी संधी मिळणार नाही असे चित्र रविवारी होते. दुसरीकडे मातोश्रीवरून आदेश आल्यानुसार उद्धवसेनेने काँग्रेससोबत सात जागा लढवण्याचा निर्णय मान्य केला असून, शहर प्रमुख सुनील मोदी यांनीही पक्षादेश मानून निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे, तर उद्धवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शशिकांत बिडकर यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत जाणार आहेत. दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोमवारी आपली भूमिका जाहीर करणार आहे.

वाचा : महायुतीमध्ये चार जागांवरून वाद; फडणवीस, शिंदे घेणार निर्णयआमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे, तर त्यांच्याशी मतभेद झाल्याने राष्ट्रवादी (शरद पवार), वंचित बहुजन आघाडी आणि आप यांची युती झाली आहे. उद्या सर्व आघाडी, युतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेकजण अपक्ष अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत बहुतांश माजी नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. माजी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, पद्मावती काकासाहेब पाटील, माजी नगरसेवक अजित पोवार यांच्या पत्नी रुपाली पोवार, माजी नगरसेवक हरिश चौगले यांचे चिरंजीव सचिन चौगले शिवाजी कवाळे यांचे चिरंजीव रोहित कवाळे, ॲड. नीलेश नरुटे यांच्या पत्नी ॲड. पुष्पा नरुटे, सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीचे विनायक कारंडे, सरोज सरनाईक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस पक्षाने दोन टप्प्यात उमेदवारांची घोषणा करून तिकीट वाटपात आघाडी घेतली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ६१ उमेदवार दिले असून मनसेच्या एका उमेदवारास पुरस्कृत केले आहे. उमेदवारी जाहीर झालेले सर्व उमेदवार आज, सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

प्रभाग क्र. /आरक्षण / उमेदवाराचे नाव१. अनुसूचित जाती / सुभाष राजाराम बुचडे१. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला/ पुष्पा नीलेश नरुटे१. सर्वसाधारण महिला/ रुपाली अजित पोवार (धामोडकर)१. सर्वसाधारण/ सचिन हरिष चौगले५. नागरिकांचा मागास प्रवर्ग/ विनायक कृष्णराव कारंडे४. सर्वसाधारण महिला /सरोज संदीप सरनाईक४. सर्वसाधारण महिला/ स्वाती सागर यवलुजे९. नागरिकांचा मागास प्रवर्ग / नंदकुमार किरण पिसे११. सर्वसाधारण / संदीप सुभाष सरनाईक१३. सर्वसाधारण / दीपक बबनराव थोरात१५. अनुसूचित जाती /रोहित शिवाजीराव कवाळे१६. सर्वसाधारण महिला/ धनश्री महेश कोरवी१६. सर्वसाधारण महिला/ पद्मावती काकासाहेब पाटील१७. नागरिकांचा मागास प्रवर्ग / सचिन मारुती शेंडे

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election: Congress Announces Candidates; Alliance Talks Stall

Web Summary : Congress declared 14 more candidates for Kolhapur Municipal Election 2026. Alliance talks are still ongoing, with potential intervention needed from top leaders. Internal shifts within parties are also happening.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसMahayutiमहायुती