शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

सिद्धार्थनगरातून पटकारे,पद्माराजे उद्यान प्रभागांतून राऊत विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:09 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिद्धार्थनगर प्रभागातून अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे जय पटकारे आणि पद्माराजे उद्यान प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत विजयी झाले. येथील सासने मैदान परिसरातील (कै.) दिलीप देसाई बॅडमिंटन हॉल येथे दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली. जय पटकारे यांना १५८0 मते मिळाली तर अजित राऊत यांना १७0६ मते मिळाली.

ठळक मुद्देसिद्धार्थनगरातून काँग्रेसचे जय पटकारे, पद्माराजे उद्यान प्रभागांतून राष्ट्रवादीचे अजित राऊत विजयीमहापालिका पोटनिवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचेच वर्चस्व

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिद्धार्थनगर प्रभागातून अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे जय पटकारे आणि पद्माराजे उद्यान प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत विजयी झाले.येथील सासने मैदान परिसरातील (कै.) दिलीप देसाई बॅडमिंटन हॉल येथे दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली. जय पटकारे यांना १५८0 मते मिळाली तर अजित राऊत यांना १७0६ मते मिळाली.दोन्हीही प्रभागांतील पोटनिवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीमुळे शिवाजी पेठ आणि जुना बुधवार पेठ परिसरांतील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सिध्दार्थनगर प्रभागात सुमारे ६०.९४ टक्के तर पद्माराजे उद्यान प्रभागात ५८.९३ टक्के मतदान झाले होते.

अजित राऊत प्रभागनिहाय उमेदवार आणि त्यांना मिळालेली मतेसिद्धार्थनगर प्र. क्र. २८ - ताराराणी आघाडीचे नेपोलियन अशोक सोनुले यांना १२0९ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार सुशिल सुधाकर भांदिगरे यांना ८४0 मते मिळाली. काँग्रेसचे जय बाळासो पटकारे यांना १५८0 मते मिळाल्याने ते  ३७१ मतानी विजयी झाले. ३३ मते नोटासाठी मिळाली.पद्माराजे उद्यान प्र. क्र. ५५- शिवसेनेचे पीयूष मोहन चव्हाण यांना ६४३, शेकापचे स्वप्निल भीमराव पाटोळे यांना १७२ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित विश्वास राऊत यांना सर्वाधिक १५८0 मते मिळाली. ते  १०६३ मतानी विजयी झाले.

 या प्रभागात तीन अपक्ष उभे राहिले होते. त्यातील महेश शंकरराव चौगले यांना ३४४, शेखर महादेव पोवार यांना १२५ आणि राजेंद्र वसंतराव चव्हाण यांना ३३४ मते मिळाली. २२ मते या प्रभागात नोटाला मिळाली.शिवाजी पेठ आणि जुना बुधवार पेठ या पेठांचे कोल्हापुरात राजकीय वजन आहे. दोन्हीही पेठांनी महापालिकेच्या राजकारणावर नेहमीच प्रभाव ठेवला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दोन्हीही पेठांत राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.महापौर निवडणुकीसाठी दोन्हीही जागा महत्त्वाच्या असल्याने नेत्यांची घालमेल सुरू होती. पद्माराजे उद्यान प्रभागात सावित्रीबाई फुले कन्या शाळेच्या केंद्राव रराष्ट्रवादीचे आर. के. पोवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सचिन पाटील तसेच ऋतुराज क्षीरसागर हे ठिय्या मारून होते तर सिद्धार्थनगर मतदान केंद्रावर ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, तर काँग्रेसचे नगरसेवक तौफिक मुलाणी, मोहन सालपे थांबून होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर