खुपिरेत कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढली आहे. गावात ४५ रुग्ण संख्या झाली असल्याने गावाची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. खुपिरे, साबळेवाडी व शिंदेवाडी गावात केवळ ३० टक्के लसीकरण झाले असून, या गावासाठी ग्रामीण रुग्णालयातून राखीव साठा मिळावा अशी मागणी या तीन गावच्या सरपंचांनी केली होती. यामुळे ग्रामीण रुग्णालयाने या तिन्ही गावांना राखीव कोटी म्हणून काही लसीचे कुपन दिले होते.
यातून खुपिरे गावासाठी दिलेले लसीकरण कुपन ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सग्यासोयऱ्यांनाच वाटप केल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी पोलीस पाटील सविता गुरव यांच्याकडे केल्या.
कोट : खुपिरे ग्रामीण रुग्णालय तीन तालुक्यांसाठी आहे. एका गावासाठी लसीचा राखीव कोटा देता येत नाही. तरीही गावचे वाढते रुग्ण पाहता आम्ही दररोज येणाऱ्या लसीपैकी काही लस ग्रामपंचायतीला दिली. डॉ. एस. बी. थोरात वैद्यकीय अधीक्षक
कोट : दिलेल्या लसीचे कुपन सरपंच व पदाधिकारी यांनी सग्यासोयऱ्यांना वाटप केले आहे. मी फ्रंन्टलाईन वर्कर असून, मला लस मिळालेली नाही. याशिवाय ग्रामपंचायतीने मला विश्वासात न घेता लसीचे कुपन वाटले असून, सामान्य लोकांना रांगेत तिष्ठत उभा राहूनही लस मिळेना.
सविता गुरव, पोलीस पाटील
कोट : गावात कोरोना रुग्ण वाढत आहेत. खुपिरेत फक्त ३० टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणाला गती मिळावी म्हणून राखीव कोटा मागितला होता. त्याचे वाटपही झाले आहे. मान्य नसेल तर कुपन पद्धत बंद करून रांगेतील क्रमांकानुसार लसीकरण व्हावे.
दीपाली जांभळे, सरपंच खुपिरे
फोटो
:
खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयातून ग्रामपंचायतीला दिलेल्या कोरोना लसीचे टोकन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सग्यासोयऱ्यांना वाटप केल्याचा आरोप करीत वैद्यकीय अधीक्षक एस. बी. थोरात यांच्याकडे तक्रार नोंदविली. यावेळी पोलीस पाटील सविता गुरव, ‘कुंभी’चे संचालक संजय पाटील, मा. सरपंच संजय डी. पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.