शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर परिसरातून हटवल्यास संघर्ष अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 10:58 IST

Muncipal Corporation Kolhapur- फेरीवाल्यांना सध्या आहे त्याच ठिकाणी पट्टे मारून व्यवसाय करण्यास देण्यात यावे. महापालिकेने जर अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवले तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिकेने कारवाई केल्यास शहरातील सर्व भाजी मंडई बंद ठेवण्याचीही भूमिका घेतली.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिर परिसरातून हटवल्यास संघर्ष अटळफेरीवाला कृती समिती : आहे त्याच जागेवर व्यवसाय करण्यावर ठाम

कोल्हापूर : फेरीवाल्यांना सध्या आहे त्याच ठिकाणी पट्टे मारून व्यवसाय करण्यास देण्यात यावे. महापालिकेने जर अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवले तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिकेने कारवाई केल्यास शहरातील सर्व भाजी मंडई बंद ठेवण्याचीही भूमिका घेतली.महापालिका प्रशासन शहरातील अतिक्रमण कारवाईवर ठाम आहे. मंदिरे, हॉस्पिटल या परिसरातील १०० मीटरमधील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. फेरीवाल्यांचा याला विरोध आहे. यासंदर्भात फेरीवाला कृती समितीने सकाळी शिवाजी चौकात निदर्शने केली. सायंकाळी शिष्टमंडळाने आ. चंद्रकांत जाधव यांची भेट घेतली. अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका फेरीवाल्यांनी घेतली.आ. जाधव म्हणाले, महापालिका प्रशासनाला फेरीवाल्यांना पट्टे मारून व्यवसाय करण्याची मुबा देण्याची सूचना केली आहे. आज, मंगळवारी यावर तोडगा निघेल, अशी अपेक्ष आहे अन्यथा बुधवारी प्रशासन, फेरीवाला यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल.चौकटफेरीवाल्यांच्या मागण्यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन बैठक घेण्याची मागणी केली. सोमवारी शिवाजी मार्केट येथील आंदोलनावेळीही बैठकीसाठी चार वेळा फोन केला. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. अंबाबाई मंदिर परिसरात ५० वर्षांपासून फेरीवाला व्यवसाय करतात. त्यांना हटवू देणार नाही. आहे तेथेच वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे पट्टे मारून व्यवसाय करू द्यावा, अन्यथा प्रशासनाशी संघर्ष अटळ असल्याचे सर्व पक्षीय कृती समितीचे आर.के. पोवार यांनी म्हटले आहे.महापालिका प्रशासनाकडून मंदिर परिसरातील अतिक्रमणावरील कारवाईवर ठाम आहेत. या उलट फेरीवालेही येथून हटण्यास तयार नाहीत. महापालिकेने कारवाई सुरू केल्यास भाजी मंडई बंदच ठेवू, अशी टोकाची भूमिका फेरीवाल्यांनी घेतली आहे. महापालिका, फेरीवाले यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर