NCP:राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची आज कोल्हापुरात सांगता सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 12:05 IST2022-04-23T12:05:04+5:302022-04-23T12:05:58+5:30

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील डझनभर मंत्री उपस्थित राहणार आहेत. गेली सहा महिने विरोधकांनी केलेल्या आरोपांना करारा जवाब देण्याची तयारी पक्षाने केली आहे.

Concluding meeting of NCP Parivar Samvad Yatra in Kolhapur today | NCP:राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची आज कोल्हापुरात सांगता सभा

NCP:राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची आज कोल्हापुरात सांगता सभा

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार यात्रेची सांगता सभा आज, शनिवारी सायंकाळी पाच वाजता तपोवन मैदानावर होत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील डझनभर मंत्री उपस्थित राहणार आहेत. गेली सहा महिने विरोधकांनी केलेल्या आरोपांना करारा जवाब देण्याची तयारी पक्षाने केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ काढली आहे. गेली तीन दिवस ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा मतदारसंघानिहाय त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला आहे. या यात्रेत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना, प्रदेशाध्यक्ष म्हणून पाटील यांनी नोंदवलेल्या गोष्टी यावर भविष्यात पक्षाची वाटचाल राहणार आहे. या यात्रेची सांगता कोल्हापुरातील तपोवन मैदानावर होत आहे.

पक्षाध्यक्ष पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील डझनभर मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्ष बळकटीची दिशा देणार असले तरी विरोधकांना करारा जवाब देण्याची तयारी केली आहे.

शरद पवार मुक्कामाला कोल्हापुरात

ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज, शनिवारी दुपारी तीन वाजता कोल्हापुरात येत आहेत. पाच वाजता ते सभेला जाणार आहेत. त्यानंतर ते कोल्हापुरातच मुक्काम करणार आहेत. उद्या, रविवारी सकाळी आठ वाजता पुण्याला रवाना होणार आहेत.

Web Title: Concluding meeting of NCP Parivar Samvad Yatra in Kolhapur today