शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

पुन्हा एकदा कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये अवयवदान शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 5:41 PM

इमारतीच्या बांधकामावरून पडून मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांच्या निर्णयानुसार यकृत व दोन किडन्या असे एकूण तीन अवयव दान करण्याची शस्त्रक्रिया कोल्हापुरातील डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये

ठळक मुद्देतिघांना जीवदान; अवयव पुण्याला पाठविले  २०१८ रोजी अशाच प्रकारची अवयवदान शस्त्रक्रिया करण्यात आली

कोल्हापूर : इमारतीच्या बांधकामावरून पडून मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांच्या निर्णयानुसार यकृत व दोन किडन्या असे एकूण तीन अवयव दान करण्याची शस्त्रक्रिया कोल्हापुरातील डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्यांदा गुरुवारी दुपारी राबविली. शिवा सोरेन माहोर (वय १९, रा. नाचणे रोड, रत्नागिरी) असे मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे नाव असून, त्याची एक किडनी व यकृत ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्यातील ज्युपिटर व सह्याद्री रुग्णालयाकडे पाठविले. यासाठी वाहतूक शाखेने विशेष पोलीस बंदोबस्त ठेवून रस्ते रिकामे केले होते. 

रत्नागिरी येथील नाचणे रोड परिसरात एका पाच मजली इमारतीचे काम सुरू आहे. या कामावर सोरेन माहोर हे आपल्या कुटुंबासह काम करीत आहेत. मूळचे उत्तर प्रदेशातील हे कुटुंब गेली नऊ वर्षे रत्नाागिरीत बांधकामावर काम करीत आहे. मंगळवारी (दि. ९ ) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नाचणे रोडवरील इमारतीमध्ये सेंट्रिंग काम करताना पाचव्या मजल्यावरून सोरेन माहोर यांचा १९ वर्षीय मुलगा शिवा खाली पडला. त्याला तेथे स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथील उपचारानंतर त्याला आहे त्या स्थितीत बुधवारी (दि. १०) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास नातेवाइकांनी कोल्हापुरातील महावीर कॉलेज परिसरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दाखल केल्यानंतर त्याच्या मेंदूत अतिरक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातच त्याचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याचे सायंकाळी सहा वाजता निष्पन्न झाले व डॉक्टरांनीही मेंदू मृत झाल्याचे घोषित केले. त्याची कल्पना त्याच्या नातेवाइकांना देण्यात आली.

रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वडील सोरेन यांना अवयवदानाविषयी माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाशी चर्चाही केली. ही संकल्पना पटल्यानंतर सोरेन माहोर यांनी रुग्णाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. अवयवदानाबाबत सेंट्रल कमिटीशी चर्चा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अवयवदान शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी सकाळी पुण्यातील संबंधित रुग्णालयाच्या रुग्णवाहिका ‘डायमंड’ रुग्णालयात दाखल झाल्या. शिवा सोरेन यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्यातील एक किडनी ‘डायमंड’मध्येच एका रुग्णाला प्रत्यारोपण केली; तर ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे दुसरी किडनी सह्याद्री हॉस्पिटलकडे, तर यकृत पुणे येथीलच ज्युपिटर हॉस्पिटलकडे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाठविण्यात आले. 

‘डायमंड’मध्ये न्यूरो सर्जन डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर, अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. साईप्रसाद, किडनी स्पेशालिस्ट डॉ. विलास नाईक यांनी ही शस्त्रक्रिया राबविली. याबाबतची माहिती डॉ. आनंद सलगर यांनी दिली. ‘ग्रीन कॉरिडॉर’ अवयव रुग्णालयाकडून दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया दुपारी साडेचार वाजता शस्त्रक्रियेनंतर एक किडनी पुण्यातील ‘सह्याद्री’मध्ये, तर यकृत ज्युपिटर हॉस्पिटल (पुणे) येथे ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे पाठविले. तेथे त्यांचे गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण केले. यापूर्वी या रुग्णालयात १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अशाच प्रकारची अवयवदान शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा गुरुवारी ही शस्त्रक्रिया करून अवयव पुण्याला पाठविण्यात आले. यात अवयव घेऊन रुग्णवाहिकेने जिल्हाधिकारी कार्यालय, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी चौक, तावडे हॉटेलमार्गे राष्टय महामार्गावरून पुण्याकडे प्रयाण केले. शहरातील मार्गावर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पोरे यांच्या नेतृत्वाखाली २५ पोलीस कर्मचाऱ्यांनी  ‘ग्रीन कॉरिडॉर’ राबविला. मृत शिवा वडील सोरेन माहोर यांना मदत म्हणून नाचणे येथील इमारतीवर सेट्रिंगचे काम करीत होता. विशेष म्हणजे शिवाने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती. तो बारावीत प्रवेश घेणार होता. तत्पूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली. त्यात मेंदू मृत झाला. त्यामुळे त्याला शिक्षण घेऊन मोठे होण्याची त्याची इच्छा अपूर्णच राहिली. माहोर यांचे कुटुंबीय गेली नऊ वर्षे उत्तरप्रदेशातून रत्नागिरीत कामानिमित्त आले आहे. येथेच इमारतींवर काम करून ते आपला उदरनिर्वाह चालवितात. शिवाच्या पश्चात त्याच्या कुटुंबात आई, वडील, बहीण आहे.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणेhospitalहॉस्पिटल