गडहिंग्लज पालिकेत बेकायदा कर्मचारी नियुक्तीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:09+5:302021-02-05T06:59:09+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेकडील सेवानिवृत्त सफाई कर्मचारी रत्नव्वा अण्णव्वा सावरे यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर झालेली विशाल गोपाळ सोनटक्के यांची ...

Complaint of illegal recruitment of staff in Gadhinglaj Municipality | गडहिंग्लज पालिकेत बेकायदा कर्मचारी नियुक्तीची तक्रार

गडहिंग्लज पालिकेत बेकायदा कर्मचारी नियुक्तीची तक्रार

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेकडील सेवानिवृत्त सफाई कर्मचारी रत्नव्वा अण्णव्वा सावरे यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर झालेली विशाल गोपाळ सोनटक्के यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे. त्यासंदर्भात सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे, ३० ऑक्टोबर २०२० रोजी सावरे या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांनी २६ ऑगस्ट २०१४ रोजी हृषिकेश चंद्रकांत सावरे याला रितसर दत्तक घेतले आहे. त्यामुळे तो त्यांची देखभाल करतो.

दरम्यान, रत्नव्वा यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा गैरफायदा घेऊन सोनटक्के यांनी त्यांच्याकडून अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी १०० रुपयांच्या स्टॅम्पवर जुजबी संमती घेतली आहे. पालिका प्रशासनाने बेकायदेशीरपणे सोनटक्के यांना सेवेत समावेश करून घेतले आहे. ही नियुक्ती रद्द करून ऋषिकेश यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

------------------------

प्रतिक्रिया :

रत्नव्वा सावरे यांनी केलेल्या नामनिर्देशनानुसारच सोनटक्के यांना रितसर सेवेत सामावून घेण्यात आले आहे. त्यात कोणताही गैरप्रकार घडलेला नाही.

नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगरपरिषद.

Web Title: Complaint of illegal recruitment of staff in Gadhinglaj Municipality