शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांवर आयोगाची नजर

By admin | Updated: October 19, 2015 00:50 IST

महापालिका निवडणूक : आजपासून अंमलबजावणी; कोम्बिंग आॅपरेशन

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, चिन्हांचे वाटप हा महत्त्वाचा टप्पा शनिवारी पूर्ण झाल्यानंतर आता आज, रविवारपासून आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीस सुरुवात होणार असून, कोम्बिंग आॅपरेशन, भरारी पथकांद्वारे डोळ्यांत तेल घालून टेहळणी केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर व पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर शहरात निवडणूक सुरू असल्याने आचारसंहिता पालनकरण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून रविवारपासून पोलीस बंदोबस्तात भरारी पथके उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत. सात क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांची सात पथके, मुख्य निवडणूक कार्यालयातील दोन भरारी पथके संपूर्ण शहरभर टेहळणी करणार आहेत. तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य अशा सहा रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार आहे. ही नाकाबंदी चोवीस तास राहील. कोम्बिंग आॅपरेशन रात्रीच्या वेळी केले जाणार असून, शहर तसेच परिसरातील लॉजेस, हॉटेलवर तपासण्या केल्या जाणार आहेत. आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या १९ तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्याची चौकशी करून चार गुन्हे दाखल झाले आहेत. २० ठिकाणी संवेदनशील केंद्रे निवडणुकीच्या निमित्ताने पोलिसांनी शहरातील २० ठिकाणे संवेदनशील म्हणून निश्चित केली आहेत.या ठिकाणी किती केंद्रे येतात हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ठिकाणांवरून तेथील मतदान केंद्र संवेदशील असतील त्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त राहील, असे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले. शहर परिसरात परवानाधारक ७१८ शस्त्रधारकांपैकी १०० शस्त्रधारकांनी आपली हत्यारे पोलीस ठाण्यात जमा केली असून, जमा करण्याची प्रक्रिया सुरूआहे, असेही त्यांनी सांगितले. मतदानादिवशी कडेकोट बंदोबस्त ८१ प्रभागांत ३७८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. १ नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदानादिवशी एक पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच उपाधीक्षक, १२ पोलीस निरीक्षक, २७ उपनिरीक्षक, १३६० पोलीस, १००० होमगार्डस् तसेच दोन सीआरपीएफ कंपनी असा कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.