शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST

कोल्हापूर : सुखकर्ता, दुखहर्त, विघ्नविनाशक, ऐश्वर्यसंपन्न, चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आपल्या आगमनाने भक्तांवर अपूर्व उत्साह, आनंदाची बरसात करणाऱ्या ...

कोल्हापूर : सुखकर्ता, दुखहर्त, विघ्नविनाशक, ऐश्वर्यसंपन्न, चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आपल्या आगमनाने भक्तांवर अपूर्व उत्साह, आनंदाची बरसात करणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या गणेशोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने महापूर आणि कोरोनाने आलेली सगळी नकारात्मकता पंचगंगेच्या पात्रात विसर्जित करत कोल्हापूरकरांनी बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे... दुसरीकडे बाजारपेठेत उधाण येऊन नवसंजीवनी मिळाली आहे.

आयुष्यातील ताणतणाव, धकाधकीचे जीवन, सुख-दुखाचा घेरा, संघर्ष या सगळ्या आव्हानांशी लढण्याचे बळ देणारा हा गणेशोत्सव. एरवी मंदिरात बंदिस्त असलेला गणपती बाप्पा घराघरात येतो. वर्षातून एकदा येणाऱ्या या देवाच्या स्वागतासाठी काय करू आणि काय नको, अशी पामर भक्तांची अवस्था होते. आज देव घरी येणार म्हटल्यावर गेल्या आठ दिवसांपासून सजावटीची प्राथमिक तयारी सुरू होती; पण उत्सवाच्या पूर्वसंध्येला हातातली सगळी काम बाजूला ठेवून बाजारपेेठेत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी लोटली होती. कोरोनाच्या छायेनंतर कित्येक महिन्यांनी अशी गर्दी रस्त्यांवर दिसत होती.

शहरातील पापाची तिकटी आणि महापालिकेमागील कटलरी मार्केट हे सजावटीचे साहित्य मिळण्याचे ठिकाण. येेथे गुरुवारी फुलांच्या माळा, झुंबर, गवताच्या माळा, पानंफुलं, वेली, तोरण, प्रवेशद्वाराला लावायच्या माळा असे एकाहून एक सुंदर साहित्य लक्ष वेधून घेत होते. सजावटीसाठी काही तासांचाच अवधी राहिल्याने येथे खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. दुकानात आणि बाहेरही ग्राहकांना सांभाळताना व्यावसायिकांची तारांबळ होत होती. सगळा बाजार एकाच ठिकाणी होत असल्याने येथे शहर लोटले होते. सायंकाळनंतर तर येथे येणाऱ्या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होत होती.

--

एक दिवस आधीच मूर्तीचे आगमन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कुंभारांकडून आदल्या दिवशीच गणेशमूर्ती न्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याला प्रतिसाद देत गुरुवारी दुपारपासूनच अनेक नागरिक गणेशमूर्ती घरी घेऊन जात होते. त्यामुळे शहरातील शाहुपुरी, गंगावेश, कुंभार गल्लीत आपला देव नेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. याशिवाय उपनगरांमधील स्टॉलवरून मूर्ती नेल्या जात होत्या.

---

अमाप उत्साह... खरेदीला उधाण

महापूर, कोरोना, पुन्हा महापूर, कोरोना या चक्राने सगळीकडे निराशेचे वातावरण होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही नकारात्मकता निघून गेली. लोक आपल्या ऐपतीप्रमाणे प्रसंगी तडजोड करत उत्सवाची तयारी करत आहेत. सणाच्या तयारीसाठी आबालवृद्धांमध्ये मोठा उत्साह आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत उलाढाल सुरू झाली. नागरिकांची आर्थिक कोंडी लक्षात घेऊन व्यावसायिकांनीही साहित्यांचे दर आटोक्यात ठेवले होते, त्यामुळे खरेदीला उधाण आले.

--

घराघरात सजावट..

घराघरांत आरास, सजावटीची मांडणी सुरू आहे. गणपतीची प्रतिष्ठापना करायच्या जागेची स्वच्छता, टेबलची मांडणी, त्यावर कापडी गालिचा मागे सुरेख पडदे, विजेच्या माळा, आसन, मंदिरे अशी सुंदर आरास केली जात आहे. अनेक कुटुंबांमध्ये थीमनुसार सजावट केली जात आहे.

--

नारळ, खिरीचे गहू, पूजा साहित्यांना मागणी

पाच दिवस गणपतीची आरती, नैवेद्यासाठी नारळ, पानं, झेंडूची फुलं, धूप, अगबत्ती, कापूर, अष्टगंध, हळद-कुंकू, खाऊची पानं, बदाम, सुपारी अशा पूजेच्या साहित्यांचा मोठी मागणी आहे. आगमनादिवशी खीर आणि मोदक केले जातात, त्यामुळे गहू, खोबरं, काजू, बदाम, खसखस, चारोळी, बेदाणे या साहित्यांच्या खरेदीसाठी लक्ष्मीपुरी बाजारपेठेत गर्दी होती.

--

..असा आहे गणेशोत्सव

शुक्रवार (दि. १०) : गणेश आगमन

रविवार (दि. १२) : गौरी आवाहन

सोमवार (दि. १३) : गौरी पूजन

मंगळवार (दि. १४) : घरगुती गौरी-गणपती विसर्जन

रविवार (दि. १९) : अनंत चतुर्दशी, मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन.

--

फोटो फाईल स्वतंत्र