Kolhapur: सावंत थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी
By पोपट केशव पवार | Updated: February 28, 2025 16:04 IST2025-02-28T16:02:52+5:302025-02-28T16:04:20+5:30
कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी देण्याचा आल्याचा प्रकार आज, शुक्रवारी घडला. सावंत माजलाय, थोड्या ...

Kolhapur: सावंत थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी
कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी देण्याचा आल्याचा प्रकार आज, शुक्रवारी घडला. सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू, अशी धमकी केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने एका यूट्यूब चॅनेलच्या कमेंटबॉक्समध्ये दिली. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.
वाचा- प्रशांत कोरटकरने दिली धमकी, इंद्रजित सावंत यांनी तपासकामी कोल्हापूर पोलिसांकडे सादर केला मोबाइल
प्रशांत कोरटकर या नागपूरच्या व्यक्तीने सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी कोरटकरवर कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला असून त्याला शोधण्यासाठी कोल्हापूर पोलfस नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत.
वाचा - 'तुझ्या घरात येऊन मारेन, हा शेवटचा कॉल'
मात्र, कोरटकर अद्यापही पोलिसांना सापडला नसताना वैद्य यानेही सावंत यांचा खात्मा करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.