शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

शहर वाचविण्यासाठी सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST

इचलकरंजी : कोरोना महामारीला रोखण्यासाठी शहर व परिसरातील डॉक्टर, नर्स, ब्रदर यांनी एकत्र यावे. प्रत्येकाला कामाचे योग्य मानधन निश्चितपणे ...

इचलकरंजी : कोरोना महामारीला रोखण्यासाठी शहर व परिसरातील डॉक्टर, नर्स, ब्रदर यांनी एकत्र यावे. प्रत्येकाला कामाचे योग्य मानधन निश्चितपणे मिळेल. त्यामुळे सर्वांनी शहर वाचविण्यासाठी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे शहरावर मोठे संकट उद्भवले आहे. त्याला रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या शहर व परिसरात २१ केंद्रांद्वारे लसीकरण सुरू असून, ती वाढवून ५१ करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्या अनुषंगाने केंद्रावर कामासाठी इच्छुक असलेल्याची बैठक ताराराणी पक्ष कार्यालयात घेण्यात आली. आयजीएम रुग्णालय व व्यंकटेश्वरा सेंटरमध्ये ऑक्सिजन संदर्भातील माहिती असलेल्या तज्ज्ञांची गरज असून तज्ज्ञ डॉक्टरांनी पुढे यावे. आपल्या कौशल्याच्या माध्यमातून शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. ही नियुक्ती व त्यासाठीचे मानधन शासनाकडून मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असून त्याची जबाबदारी मी स्वीकारतो, असेही त्यांनी सांगितले. बैठकीस आरोग्य सभापती संजय केंगार, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, नगरसेवक सुनील पाटील, अहमद मुजावर, राजू मगदूम, संजय आरेकर, स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

२९०४२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजी ताराराणी पक्ष कार्यालयात डॉक्टर व नर्स यांच्या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी आरोग्य सभापती संजय केंगार, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, नगरसेवक सुनील पाटील, आदी उपस्थित होते.