शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

कोल्हापुरात थंडीची चाहूल : तापमान १७ डिग्रीपर्यंत घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:05 PM

साधारणत: आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याकडे थंडी सुरू होते. नोव्हेंबर महिन्यात ती हळूहळू वाढत जाते; पण परतीच्या पावसाने ऋतुमानच बदलून गेले. नोव्हेंबर महिना निम्मा झाला तरी थंडीचा पत्ताच नव्हता.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची चाहुल लागली असून, तापमानात १७ डिग्रीपर्यंत घसरण झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडी हळूहळू वाढू लागली आहे. यंदा जुलै-आॅगस्ट महिन्यांत अतिवृष्टी आणि आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परतीचा पाऊस राहिला.

साधारणत: आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याकडे थंडी सुरू होते. नोव्हेंबर महिन्यात ती हळूहळू वाढत जाते; पण परतीच्या पावसाने ऋतुमानच बदलून गेले. नोव्हेंबर महिना निम्मा झाला तरी थंडीचा पत्ताच नव्हता. ढगाळ वातावरणासह कडक ऊन राहिले; मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून कोल्हापूर शहर व जिल्ह्यात थंडीची चाहुल लागली आहे. मध्यरात्रीपासून थंडी वाढत जाते, सकाळी सातपर्यंत तीव्रता कायम राहते; मात्र त्यानंतर दिवसभर हवेत गारवा जाणवत नाही.

सायंकाळी मात्र पुन्हा थंडी जाणवू लागते.मंगळवारी किमान तापमान १७, तर कमाल ३२ डिग्रीपर्यंत राहिले. रात्री आठ पर्यंत साधारणत: १८-१९ डिग्रीपर्यंत तापमान राहिले, त्यानंतर घसरण होत ते १७ डिग्रीपर्यंत पोहोचले. आगामी तीन-चार दिवस जिल्ह्याचे तापमान असेच राहणार आहे. थंडीची चाहुल लागल्याने उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी होऊ लागली. स्वेटर, कानटोपी या कपड्यांसह उबदार पांघरुण असणाऱ्या दुकानात गर्दी पाहावयास मिळत आहे.दाट धुक्याची प्रतीक्षा!नोव्हेंबर महिन्यात दाट धुक्याच्या पांघरुणासह गुलाबी थंडी सगळीकडे पाहावयास मिळते; मात्र यंदा अद्याप दाट धुक्याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.लहान मुले, वयोवृद्धांना सांभाळाथंडी सुरू झाल्याने याचा सर्वांत जास्त त्रास लहान मुले, वयोवृद्धांना होणार आहे. सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू होऊ शकतो, असे मत डॉक्टरांचे आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमान