महाद्वार रोडवरील कोल्ड्रिंक हाऊसला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST2021-01-14T04:19:55+5:302021-01-14T04:19:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिराजवळील एका कोल्ड्रिंक हाऊसच्या पहिल्या मजल्यावर पहाटे शॉर्ट सर्किटने आग ...

Cold drink house fire on Mahadwar Road | महाद्वार रोडवरील कोल्ड्रिंक हाऊसला आग

महाद्वार रोडवरील कोल्ड्रिंक हाऊसला आग

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिराजवळील एका कोल्ड्रिंक हाऊसच्या पहिल्या मजल्यावर पहाटे शॉर्ट सर्किटने आग लागली. अग्निशामक दलाने सतर्कता दाखवत ही आग सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर अटोक्‍यात आणली. यात फ्रीज‌, फर्निचरसह सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती, महाद्वार रोडवर धवल भगवान पोवार यांचे ‘तृषाशांती’ कोल्ड्रिंक हाऊस आहे. पहाटेच्या सुमारास या कोल्ड्रिंक हाऊसच्या पहिल्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे एका वृत्तपत्र विक्रेत्याने पाहिले. त्यांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली असता घटनास्थळी अग्निशामक दलाचे दोन बंब दाखल झाले. दरम्यान, शेजाऱ्यांनी कोल्ड्रिंक हाऊसचे मालक पोवार यांना याची माहिती दिली. तेही घटनास्थळी दाखल झाले. पहिल्या मजल्यावरील फर्निचर, सिलिंग, वायरिंगसह येथील फ्रीजसह मशीन या आगीत जळून खाक झाले. तब्बल अर्धा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्‍यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला; पण या आगीत सुमारे तीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याचे मालक पोवार यांच्याकडून सांगण्यात आले.

Web Title: Cold drink house fire on Mahadwar Road