महाराष्ट्रातील 'या' गावामध्ये आढळले नेदरलॅंडच्या राणीचे नाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 13:18 IST2022-06-20T13:04:24+5:302022-06-20T13:18:54+5:30
कसबा बीड हे ऐतिहासिक गाव असून येथे सुवर्णमुद्रांशिवाय इतरही नाणी अनेकदा सापडली आहेत.

महाराष्ट्रातील 'या' गावामध्ये आढळले नेदरलॅंडच्या राणीचे नाणे
कसबा बीड : कसबा बीड हे ऐतिहासिक गाव असून येथे सुवर्णमुद्रांशिवाय इतरही नाणी अनेकदा सापडली आहेत. शनिवारी स्वप्निल अरुण खांडेकर यांना विद्यामंदिर कसबा बीड परिसरास लागून असलेल्या चर्चच्या आवारात नेदरलँडची राणी ज्युलियाना (ज्युलियाना लुई एमा मरी विल्हेमिना) यांचे १० सेंट किमतीचे नाणे सापडले.
राणी ज्युलियाना यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ ला झाला असून त्या इ.स. १९४८ ते १९८० या कार्यकाळात नेदरलॅंडच्या राणी होत्या. यांच्या कारकीर्दीतच द नेदरलॅंड्स बॅंक यांच्यामार्फत हे नाणे सन १९५० पासून चलनात आणले गेले. २००१ पासून हे नाणे चलनातून बाद करण्यात आले आहे.
या नाण्याच्या एका बाजूला राणी ज्युलियाना यांचे नाव कोरले आहे, तर पाठीमागच्या बाजूवर शाही डच मुकुट आहे. नाण्याची किंमत (१० सेंट) यांचे अंकण आहे. कसबा बीड गावात नाणी सापडणं, हे सर्वसाधारण असलं तरी, अशा प्रकारची परकीय मुद्रा आढळणे, ही दुर्मिळच बाब म्हणावी लागेल.