कोल्हापूरातील गिर्यारोहकाचा ब्रम्हगिरी पर्वतावर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 16:31 IST2021-02-15T16:30:20+5:302021-02-15T16:31:50+5:30
Death Kolhapur- कोल्हापूर येथील गिर्यारोहक श्रीपाद उर्फ मनिष हणमंत जोशी (वंदूरकर) यांचा त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील ब्रम्हगिरी पर्वतावर चढताना ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

कोल्हापूरातील गिर्यारोहकाचा ब्रम्हगिरी पर्वतावर मृत्यू
कोल्हापूर : येथील गिर्यारोहक श्रीपाद उर्फ मनिष हणमंत जोशी (वंदूरकर) यांचा त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील ब्रम्हगिरी पर्वतावर चढताना ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
३८ वर्षीय श्रीपाद हे कोल्हापूरातील साळोखेनगर येथील वसंत विश्वास पार्कचे रहिवाशी होते.े रविवारी १४ फेब्रुवारी रोजी ते गियार्रोहणासाठी नाशिकजवळील त्रयबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर गेले होते. चढाई करताना सकाळी त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, बहिण, काकाकाकू असा मोठा परिवार आहे. ते हणमंत गणेश जोशी यांचे चिरंजीव आणि अॅड. गोपाळ गणेश जोशी यांचे पुतणे होत.