शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

स्वच्छता सर्वेक्षणास कागलकर एकवटले गट-तट बाजूला... : नेतेमंडळी, नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक हातात झाडू घेऊन साफ-सफाईसाठी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:22 IST

कागल : केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेसाठी कागल नगरपरिषदेने जय्यत तयारी केली असताना या स्पर्धेचा ‘फिव्हर’ कागलकरांमध्येही संचारला आहे

जहाँगीर शेख ।कागल : केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेसाठी कागल नगरपरिषदेने जय्यत तयारी केली असताना या स्पर्धेचा ‘फिव्हर’ कागलकरांमध्येही संचारला आहे. अनेक दिग्गज्जांसह नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक हातात झाडू घेऊन साफ-सफाईसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र रोज सकाळी प्रत्येक प्रभागात पाहावयास मिळत आहे.

एकूणच कागल देशात अव्वल करण्यासाठी गट-तट, पक्ष-भेद विसरून कागलकर एकवटले आहेत.प्रशासकीय पातळीवर गेले सहा महिने या स्पर्धेची तयारी सुरू आहे. विशेषत: स्वच्छता आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे नियोजन करीत आहेत. स्थानिक पातळीवर ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसडर म्हणून आम. हसन मुश्रीफ यांची निवड केली आहे. त्यांनीही या मोहिमेसाठी पुरेसा वेळ दिला आहे. मोबाईल अ‍ॅपसाठी युवकांशी संवाद साधला आहे.

महारॅलीद्वारे संपूर्ण शहरात पदयात्रा काढली आहे. या महारॅलीत भाजपाचे नगरसेवकही सहभागी झाले. शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असणाºया भिंती रंगवून त्यावर संदेश लिहिले आहेत. वेशींना रंगरंगोटी केली आहे, त्यामुळे शहर आकर्षक दिसत आहे. आता प्रत्यक्ष केंद्रीय समिती सर्वेक्षणासाठी येणार असून, पालिकेचे कर्मचारी सकाळ-संध्याकाळ गटर्स, रस्ते सफाई, तसेच कचरा उठाव करीत आहेत. हे पाहून त्यांना सहकार्य म्हणून आता कार्यकर्ते, नेते, नागरिक, युवक मंडळे, स्वत:हून गटर्स, रस्ते साफ-सफाई करीत आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावयाचा हाच यामागचा निर्धार आहे. म्हणूनच चंद्रकांत गवळी, भय्या मानेपासून नविद मुश्रीफही सफाईसाठी रस्त्यावर दिसत आहेत.कागल नवव्या स्थानावरदेशातील ४०४१ शहरात या स्पर्धा होत आहेत. कागल नगरपालिकेने सांघिक पातळीवर केलेल्या प्रयत्नाने मोबाईल अ‍ॅप विभागात नवव्या स्थानावर झेप घेऊन पैकीच्या पैकी गुण संपादन केले आहेत. मात्र, आता सर्वेक्षणात शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, उद्याने, बगीचे, व्यापारी क्षेत्र लाईन, जनसंवाद, आदींची पाहणी करून स्थान निश्चित केले जाणार आहे. म्हणूनच लोकसहभाग महत्त्वाचा ठरत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत कागल अव्वल स्थानावर आले पाहिजे. यासाठी राजकारण बाजूला ठेवून आम्ही विरोधी पक्षांचे सर्व नगरसेवक सकारात्मक विचाराने या मोहिमेत सहभागी झालो आहोत. आमचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी नेहमीच चांगल्या गोष्टींना पाठिंबा दिला आहे.- विशाल पाटील-मलगेकर, विरोधी पक्ष नेता, नगरपरिषद 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर