शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता, आज सायंकाळपर्यंत मूळ मूर्तीचे दर्शन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:55 IST

भाविकांच्या सोयीसाठी देवीची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात येईल

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची आज बुधवारी स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन दिवसभर बंद राहील. भाविकांच्या सोयीसाठी देवीची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी सात वाजता अभिषेक, सालंकृत पूजेनंतर दर्शन पूर्ववत सुरू होईल.अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला पाच दिवस राहिले असून, आज बुधवारी देवीच्या मूळ गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. अंबाबाईचा सकाळी साडेआठचा अभिषेक केल्यानंतर देवीच्या मूळ मूर्तीला इरलं पांघरले जाईल. त्यानंतर दिवसभर गाभारा स्वच्छता होईल. यामध्ये श्रीपूजक, सफाई कर्मचारीदेखील सहभागी होतात. भाविकांना देवीचे दर्शन व्हावे यासाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिर येथे दर्शनासाठी ठेवली जाईल. सायंकाळी साडेसहा वाजता देवीचा अभिषेक, सालंकृत पूजा व आरती झाल्यानंतर मूळ मूर्तीचे दर्शन सुरू होईल.

अग्निशमन यंत्रणेकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणमंगळवारी दुपारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात बंदोबस्ताला असलेले पोलिस, सुरक्षा रक्षक, देवस्थान समितीचे कर्मचारी व दुकानदारांना अग्निशमन यंत्रणा कशी हाताळावी याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, अचानक कुठे आग लागली किंवा दुर्घटना घडल्यास तातडीने काय खबरदारी व उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजननवरात्रौत्सवात रोज अंबाबाई मंदिर आवारात देवस्थान समितीतर्फे भजन, कीर्त, भावगीते, भक्तिगीते, भरतनाट्यम, कथम, गोंधळ यासह पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यासाठी समितीकडे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असून, पुढील दोन दिवसांत कार्यक्रमांचे वेळापत्रक ठरवले जाईल.