शहरातील बारावीचे वर्ग मंगळवारपासून भरणार, विद्यार्थ्यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 14:36 IST2020-11-28T14:35:11+5:302020-11-28T14:36:37+5:30
coronavirus, educationsector, school, kolhapurnews कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील दक्षतेच्या उपाययोजनांची तयारी आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झाल्याने शहरातील महाविद्यालयांनी इयत्ता बारावीचे वर्ग मंगळवार (दि. १ डिसेंबर) पासून भरणार आहेत. त्याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना दूरध्वनी, एसएमएसद्वारे सूचना दिल्या आहेत.

शहरातील बारावीचे वर्ग मंगळवारपासून भरणार, विद्यार्थ्यांना सूचना
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील दक्षतेच्या उपाययोजनांची तयारी आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झाल्याने शहरातील महाविद्यालयांनी इयत्ता बारावीचे वर्ग मंगळवार (दि. १ डिसेंबर) पासून भरणार आहेत. त्याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना दूरध्वनी, एसएमएसद्वारे सूचना दिल्या आहेत.
अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाच्या प्रक्रियेचा प्रारंभ गुरुवार (दि. ३ डिसेंबर) पासून होणार आहे. त्याची तयारी महाविद्यालयांनी सुरू केली आहे. जिल्हा आणि शहरातील विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरविण्याची प्रक्रिया दि. २३ नोव्हेंबरपासून सुरू झाली.
त्यामध्ये शहर वगळता जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील इयत्ता नववी, दहावीचे वर्ग भरले. महापालिकेच्या कोरोना नियंत्रण समितीने शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील व्यवस्थेची पाहणी गेल्या तीन दिवसांपूर्वी सुरू केली. या महाविद्यालयांनी कोरोनाच्या उपाययोजना केल्या आहेत. तेथील शिक्षक, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे. त्यामुळे त्यांनी मंगळवारपासून बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील ३८० शाळा सुरू
जिल्ह्यातील ३८० शाळा शुक्रवारपर्यंत सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये एकूण २४१५० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक ७३ शाळा करवीर तालुक्यात सुरू झाल्या आहेत. त्यापाठोपाठ पन्हाळा (४७), शिरोळ (३९), चंदगड (३८), कागल (३६), राधानगरी (३४), भुदरगड (३२), शाहूवाडी (२७), हातकणंगले (२६) या तालुक्यांचा क्रम आहे.