शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी पुन्हा चक्राकार आरक्षण, राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:10 IST

१३ ऑक्टोबरलाच सभापतिपदाचे आरक्षण

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण प्रक्रिया ही १९९६ला सुरू झालेल्या चक्राकार आरक्षण पद्धतीनुसारच घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मंगळवारी याबाबत निकाल दिला असल्याने आता शासनाच्या नव्या सूचनेनुसारच १३ ऑक्टोबरला आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येईल. याच दिवशी पंचायत समित्यांच्या सभापतिपदाची आरक्षण सोडत होणार आहे.राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी चक्रानुक्रमे किंवा चक्राकार पद्धतीने आरक्षण दिले जाते. यातील नियम चारनुसार प्रत्येक निवडणुकीनंतर त्या-त्या गटांमध्ये बदल करून आधीच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी आरक्षण पडले आहे त्या गट, गणांना वगळून इतर गट, गणांचा समावेश केला जात असे. त्यामुळे तेच तेच गट किंवा गण आरक्षणासाठी येत नसत. आतापर्यंतच्या पाच निवडणुकांसाठी हीच पद्धत वापरण्यात आली. मात्र, राज्य शासनाने २०२५ मध्ये नवे नियम करून त्यातील नियम १२ अंतर्गत आरक्षणासाठी ही निवडणूक पहिली निवडणूक मानावी आणि आरक्षण प्रक्रिया राबवावी, अशा सूचना दिल्या होत्या.यामुळे आधी आरक्षित झालेल्या गट, गणांवरच पुन्हा आरक्षण पडण्याची शक्यता असल्याने अनेक याचिका खंडपीठांमध्ये दाखल झाल्या होत्या. परंतु त्या फेटाळण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका २५ सप्टेंबर रोजी निकाली काढली होती; परंतु त्यामध्ये मध्य प्रदेशातील नियमांचा चुकून उल्लेख झाल्याने पक्षकारांच्या संमतीने ६ ऑक्टोबर रोजी आदेश दुरुस्त करण्यात आला.राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षायाबाबत स्थानिक पातळीवर महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबत राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन करून त्यावर निर्णय घेण्यात येईल आणि तो सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येईल. त्यानुसार पुढची प्रक्रिया होईल, असे सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Zilla Parishad to Follow Circular Reservation; Awaits State Order

Web Summary : Supreme Court mandates 1996 circular reservation for Kolhapur Zilla Parishad elections. The state government's instructions are awaited before October 13th's reservation process. Previous rules were challenged, leading to the court's directive. Revenue officials await state orders for further action.