शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शाहूंच्या स्मारकासाठी आंदोलनाचाच पर्याय

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

श्रीमंत शाहू महाराज : घरचेच असल्याचे समजून कमी महत्त्व दिले जात असल्याबद्दल खंत

कोल्हापूर : शाहू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या बाबतीत कोणी अडथळे आणत असेल, तर त्यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशा शब्दांत श्रीमंत शाहू महाराज यांनी शुक्रवारी राज्य सरकारला इशारा दिला. शंभर वर्षांपूर्वी ज्यांनी देशाच्या प्रगतीला दिशा दिली ते शाहू महाराज घरचेच आहेत, असे समजून त्यांच्याकडे कमी लक्ष दिले जात आहे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाच्या कामाचा प्रारंभ शुक्रवारी दुपारी श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री हसन मुश्रीफ होते. शाहू महाराजांची उत्तर प्रदेशात भव्य स्मारके होतात, पण महाराष्ट्रात मात्र शाहू महाराज घरचेच असल्याचे समजून कमी महत्त्व दिले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला परंतु राज्यात सत्तांतर झाल्यापासून या स्मारकाबाबतीत काहीच हालचाली होत नाहीत, असा आक्षेपही त्यांनी यावेळी नोंदविला. शाहू महाराजांचे कार्य आणि विचार सर्वांनाच मान्य आहेत. त्यांच्या विचारांना कोणाचा विरोध असायचे कारण नाही, परंतु त्यांचे हे विचार कृतीतून किती जोमाने पुढे नेले जाईल हे पुढील काळात पाहावे लागेल तसेच आतापर्यंत शाहूंचे विचार ऐकत आलो परंतु गेल्या शंभर वर्षांत त्यांच्या विचाराने प्रगती किती झाली, याचे आत्मचिंतनही करण्याची गरज आहे, असे शाहू महाराज म्हणाले. सत्तेत आल्यानंतर पंधरा दिवसांत टोल आणि एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सत्ता येऊन आठ महिने झाली तरीही टोल रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार राजेक्ष क्षीरसागर यांना विधानसभेच्या दारासमोर उभे राहून आंदोलन करावे लागत आहे. जर आश्वासन पूर्ण केले जात नसेल तर सत्तेतून बाहेर पडावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. यावेळी महापौर वैशाली डकरे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचीही भाषणे झाली. नगरसेवक महेश कदम व शशिकांत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर स्थायी सभापती आदिल फरास यांनी प्रास्ताविक केले.यावेळी उपमहापौर ज्योत्सना मेढे-पवार, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव, गटनेते राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, चंद्रकांत घाटगे, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, प्रकाश गवंडी, मधुकर रामाणे, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)शिवसेना-भाजपची उडविली खिल्लीशिवसेना-भाजपचे स्थानिक नेते एकमेकांवर करत असलेल्या टीकेची माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अक्षरश: खिल्ली उडविली. टीकेचे संदर्भ देत मुश्रीफ यांनी सत्तेतील ही मंडळी अशी एकमेकांवर टीका करत असतील तर जनतेने कोणाकडे पाहावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मनपाची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढा. कोणाची ताकद किती आहे, हे कोल्हापूरच्या जनतेला एकदा कळू दे, माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, असे मुश्रीफ म्हणाले.