शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पोलीस लाईन येथील झाडांसाठी चिपको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:54 AM

कोल्हापुरात इतकी जुनी वृक्षसंपदा फार कमी आहे. वर्षातील चार महिने येथील झाडांवर स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असतो; त्यामुळे या झाडांची जागा सोडून बांधकाम करावे, अशा मागणीचे निवेदन परिसरातील नागरिक मिलिंद यादव यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले होते.

ठळक मुद्देबांधकामांसाठी झाडे तोडण्यास, मैदान बंदिस्त करण्यास विरोधजुना बुधवार पेठ परिसरातील नागरिक, सामाजिक संघटना आक्रमक

कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील पोलीस लाईन येथील बांधकामामुळे ७० वर्षांपूर्वीची दोन झाडे तोडण्यात येणार आहेत. या विरोधात परिसरातील नागरिक, सामाजिक संघटनांनी रविवारी झाडाजवळच ठिय्या मारला; तर लहान मुलांनीही झाडाला साखळी करून ‘चिपको’ आंदोलन केले. झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्यास जेसीबीच्या आडवे पडू, एकाही झाडाला हात लावू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. परिसरातील मैदानाच्या बाजूने सुरक्षा भिंत घालून बंदिस्त करण्यालाही विरोध केला.जुना बुधवार पेठेतील पोलीस लाईन येथे पोलिसांची निवासस्थाने आहेत. येथील बांधकामे जुनी असल्याने त्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे पोलीस विभागाकडून नव्याने तीन अपार्टमेंट उभारल्या जात आहेत. यासाठी खुदाईही केली आहे; परंतु या परिसरात ७० वर्षांपूर्वीची अशोकाची दोन झाडे आहेत. कोल्हापुरात इतकी जुनी वृक्षसंपदा फार कमी आहे. वर्षातील चार महिने येथील झाडांवर स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असतो; त्यामुळे या झाडांची जागा सोडून बांधकाम करावे, अशा मागणीचे निवेदन परिसरातील नागरिक मिलिंद यादव यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले होते. तरीही झाडांच्या परिसरात खुदाई सुरूच ठेवण्यात आली. यामुळे रविवारी झाडे तोडू नयेत, या मागणीसाठी परिसरातील नागरिक, सामाजिक संघटना यांनी झाडाजवळ ठिय्या मारला. ‘आम्ही झाडे तोडू देणार नाही,’ अशा घोषणा देत लहान मुलांनी झाडाभोवती साखळी करून ‘चिपको’ आंदोलन केले. यावेळी विजय टिपुगडे, बी. एल. बरगे, सुमित कदम, अमित चव्हाण, प्रमोद नायकवडे, उदय सुर्वे, मनीषा रानमाळे, मानसी नाईक, मनीषा नाईक उपस्थित होते.--------------------------------घरांना नव्हे, झाडे तोडण्यास विरोध : उदय भोसलेबांधकामासाठी अद्यापही महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. लेआउट मंजूर झाला नसताना खुदाई सुरू केली आहे. पोलिसांच्या घरांना नव्हे तर झाडे तोडण्यास आमचा विरोध आहे. घरे तीन मजल्यांऐवजी पाचमजली बांधा; आमची हरकत नाही. मात्र, एकाही झाडाला हात लावू देणार नाही.---------------------------------------- 

मग मुलांनी खेळाचे कुठे? : माजी नगरसेवक शशिकांत पाटीलबांधकाम करताना मोकळी जागा सोडावी लागते. झाडे असणारा परिसर मोकळा ठेवून रिकाम्या जागेत बांधकाम केल्यास मार्ग निघू शकतो. येथील मुलांना खेळण्यासाठी एकमेव मैदान असून, येथेही बांधकामाची खरमाती टाकली आहे. मग मुलांनी खेळायचे कुठे?---------------------------------------पोलिसांना घरे चांगली मिळाली पाहिजेत. त्यांच्या घरांना विरोध नाही. झाडांचा परिसर सोडून बांधकाम करता येते. तरीही झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्यास जेसीबीच्या आडवे पडू. आमच्यावर गुन्हा नोंद झाला तरी आता मागे हटणार नाही. मैदानालाही सुरक्षा भिंत घालण्यात येत आहे. परिसरातील मुले मैदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे झाडे आणि मैदानासाठी लढा उभारू.

- मिलिंद यादव----------------------------------------------------------पोलीस लाईनसंदर्भात थोडक्यातनवीन बांधकाम - तीन अपार्टमेंटफ्लॅटची संख्या- १९२

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpolice parade groundपोलिस कवायत मैदान