शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनी अवांतर वाचन करावे

By admin | Updated: November 30, 2014 23:59 IST

नीलम माणगावे : मजले येथे बालसाहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन; ग्रंथदिंडीचे आकर्षण

आळते : संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी बालसाहित्य प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण भागात अशी संमेलने वरचेवर भरवली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त करीत मुलांनी पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे यांनी केले.मजले (ता. हातकणंगले) येथे आयोजित पहिल्या बालसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात माणगावे बोलत होत्या. तत्पूर्वी रजनी हिरळीकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.माणगावे म्हणाल्या, मुलांना घडविण्यात पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे. घराघरांत टी.व्ही.बरोबर पुस्तकेही दिसली पाहिजेत. लहान वयात लागलेल्या चांगल्या सवयी दीर्घकाळ टिकतात. मुलांमध्ये क्षमता असते. मात्र, त्यांना योग्यवेळी दिशा मिळणे आवश्यक असते. त्यासाठी मुलांना संस्कार स्वरूपातील पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.हिरळीकर म्हणाल्या, बालसाहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा शोध घेऊन समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. अभ्यासक्रमासोबत शिक्षकांनी मुलांना अन्य वाचनीय साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे.स्वागताध्यक्ष सचिन पाटील म्हणाले, साहित्य संमेलने वेगवेगळ्या प्रकारची होत असतात. परंतु, यामध्ये बालसाहित्यिकांना संधी दुर्मीळ असते. हा हेतू समोर ठेवून बालसाहित्य संमेलनाची संकल्पना पुढे आली. मजलेसारख्या डोंगरी भागात पहिले संमेलन भरविले. त्यास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यापुढे प्रत्येक वर्षी संमेलन भरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.सकाळी ८ वाजता गावातून ग्रंथदिंडी काढली. यामध्ये ग्रंथप्रेमींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशोक घारगे यांच्या हस्ते डॉ. सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले. अविनाश पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, उपसरपंच छाया कोठावळे, सुमन पाटील, अमित पाटील, आदी ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. दुपारच्या सत्रात ‘आपण हे वाचलेच पाहिजे!’ हा परिसंवाद झाला. कथाकथन, काव्यसंमेलन झाले. रोहिणी मोहिते, अंजली कोळी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)