कोगनोळी जवळील अपघातात चिखलीची व्यक्ती ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 16:49 IST2020-10-13T16:48:43+5:302020-10-13T16:49:47+5:30

kognolinaka, kolhapur, accident कोगनोळी येथील आरटीओ चेक पोस्टसमोर मोटरसायकलने अज्ञात वाहनास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला.

Chikhali killed in an accident near Kognoli | कोगनोळी जवळील अपघातात चिखलीची व्यक्ती ठार

कोगनोळी जवळील अपघातात चिखलीची व्यक्ती ठार

ठळक मुद्देकोगनोळी जवळील अपघातात चिखलीची व्यक्ती ठारवाहनावरील ताबा सुटल्याने अपघात

बाबासो हळिज्वाळे

कोगनोळी - येथील आरटीओ चेक पोस्टसमोर मोटरसायकलने अज्ञात वाहनास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला.

या अपघातात मोटर सायकलचालक सतीश (सचिन) राजाराम नुल्ले (वय ४०, रा. नानीबाई चिखली, ता. कागल) यांचा जागीच मृत्यू झाला तर सचिन अशोक लोहार (वय २६, रा. चिखली ता. कागल) हा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली होती.

सतीश (सचिन) राजाराम नुल्ले व सचिन अशोक लोहार हे दोघे कामानिमित्त चिखलीहुन कागलकडे निघाले होते. काम आटोपून रात्री उशिरा गावी परतत असताना कोगनोळी येथील चेकपोस्ट नाक्याजवळ वाहनावरील ताबा सुटल्याने ते अचानक समोरील वाहनावर आदळले. यामध्ये सतीश यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला सचिन लोहार गंभीर जखमी झाला.

उपचारासाठी त्याला कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती समजताच निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी घटनास्थळी भेट दिली. निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Chikhali killed in an accident near Kognoli