शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शाहूविचार संपविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात मुक्काम, विजय वड्डेटीवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 12:00 IST

'जुमलेबाज सरकारला जनता कंटाळली'

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री चार-चार दिवस कोल्हापुरात मुक्काम करत आहेत. त्यांना शाहू महाराजांच्या विचारांची इतकी भीती का आहे. ते शाहू महाराजांचे विचार संपविण्यासाठीच चार चार दिवस कोल्हापुरात मुक्काम करत आहेत. मात्र, शाहूंचा विचार मारण्यासाठी चार काय ४० दिवस थांबले तरी येथील जनता शाहू विचारांनाच बळ देईल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केला.राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून, किमान ३८ जागा जिंकू, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, जुमलेबाज सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळे ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना भीत आहेत. त्यांच्या प्रत्येक भाषणात काँग्रेसचा २५ वेळा उल्लेख केला जात असून, आमच्या जाहीरनाम्याचे पंतप्रधानच प्रचारक आहेत. भ्रष्टाचारी लोकांना नवीन मंडप घालून आपल्या जवळ बसवून घेत आहेत.

आमच्या खिडक्या काढून नेल्या..भाजपने राष्ट्रवादी, शिवसेनेची घरे फोडली. आमच्याही नांदेडसारख्या काही खिडक्या काढून नेल्या. पण, यामुळे आमचे घर उघडे पडले नाही. उलट कोल्हापुरातील शोभिवंत खिडकीमुळे आमच्या घराचे सौंदर्य अधिक वाढेल, या शब्दांत वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला. सांगलीत विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला. पण, आघाडी धर्मामुळे ती जागा शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आमचे काम असल्याचेही त्यांनी सांगितले.त्याची चौकशी व्हावीहेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नव्हता. ती गोळी कुणाची होती, याची चौकशी व्हायला हवी. ही बाब ॲड. उज्ज्वल निकम यांनी का निदर्शनास आणून दिली नाही, हा माझा सवाल होता. एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देत मी हे वक्तव्य केले होते. कसाबला फाशी देण्याचे आम्ही श्रेय घेणार नाही. त्याला फाशी होणारच होती. पण करकरे यांना लागलेली गोळी कोणाची होती हे शोधा, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारEknath Shindeएकनाथ शिंदेShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती