शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा निकाल बघूनच मुंबईला जावे, आमदार पी. एन. पाटील यांनी लगावला टोला

By विश्वास पाटील | Published: May 03, 2024 7:27 PM

'मंडलिक-मुश्रीफ वादात कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे ११२ कोटी परत गेले. तेच आता एक झाले'

यवलूज : कोल्हापुरातील वातावरण बघून दिल्ली, मुंबई कोल्हापुरात येऊन बसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीनदा येऊन गेले आज पुन्हा येत आहेत. त्यांनी आता दि. ४ जून पर्यंत कोल्हापुरातच राहून निकाल बघूनच मुंबईला जावे, असा टोला आमदार पी. एन. पाटील यांनी लगावला. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ यवलुज-पडळ येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी जयसिंग हिर्डेकर होते.आमदार पाटील म्हणाले की, कोल्हापूरला पंतप्रधान मोदी येऊन गेले. अमित शाह आलेत. मुख्यमंत्री शिंदे तीनदा येऊन गेले आणि पुन्हा येत आहेत. कोल्हापुरातील वातावरण बघून त्यांना पराभवाची भीती वाटत आहे. म्हणूनच त्यांची चलबिचल झाली आहे. या शाहू महाराजांनी इथेच काय केले असे विचारत आहेत. यांनी काय केले ते येथील शेतकऱ्यांना गावकऱ्यांना माहित आहे. सर्वसामान्यांबद्दल त्यांना कळवळा आहे. मंडलिक-मुश्रीफ वादात येथील कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे ११२ कोटी परत गेले. तेच आता एक झाले आहेत.गेल्या दहा वर्षात काहीही विकासाची ठोस कामे झालेली नाहीत. भाजपचा फसवा विकास बाजूला फेकून देऊन आपल्याला शाश्वत विकास करायचा आहे. काहीजण मी सहज कोणाला भेटणार नाही, असा अपप्रचार करीत आहेत. पण मला थेट भेटण्यास, संपर्क करण्यास कसलीही अडचण येणार नाही. संपर्क कार्यालयाच्या माध्यमातूनही सर्वांची कामे होतील, अशी ग्वाही शाहू छत्रपती यांनी दिली.यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके, बाळासाहेब खाडे, बाजीराव पाटील, दगडू भास्कर, दिनकर कांबळे, पडळच्या माजी सरपंच जयश्री राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, बाजार समिती सभापती भारत पाटील भुयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीEknath Shindeएकनाथ शिंदेP. N. Patilपी. एन. पाटील