मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ११ जूनला कोल्हापूर दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 12:33 IST2023-05-31T12:33:03+5:302023-05-31T12:33:31+5:30

५ जूनला मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली होती

Chief Minister Eknath Shinde on his visit to Kolhapur on June 11 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ११ जूनला कोल्हापूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ११ जूनला कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ११ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, शहरातील मध्यवर्ती पेटाळा मैदानात सायंकाळी ६:०० वाजता त्यांची सभा होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. 

याआधी २८ मे रोजी मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा नियोजित केला होता. मात्र, संसद भवनाच्या उद्घाटनामुळे तो रद्द करावा लागला. यानंतर ५ जूनला मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली होती. मात्र, आता ११ जूनला मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.

Web Title: Chief Minister Eknath Shinde on his visit to Kolhapur on June 11