शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी कोल्हापुरात; शेंडा पार्क रुग्णालय भूमिपूजन, जिल्हा बँक इमारतीचे उद्घाटन होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:36 IST

'आरोग्य सेवेत मुश्रीफ यांचे नाव'

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित बुधवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजता तपोवन मैदानावर होत असलेला मेळावा यशस्वी करा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.शेंडापार्क येथील ११०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन, जिल्हा बँकेच्या विस्तारित इमारतीचे उदघाटन व मेळाव्याच्या नियोजनासाठी रविवारी शासकीय विश्रामगृहात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरातील सामान्य माणसाला उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज भासू नये, यासाठी प्रशस्त असे रुग्णालय मंजूर केले. विविध वैद्यकीय महाविद्यालये सुरू करत आहोत, इतकी चांगली आरोग्य सेवा पश्चिम महाराष्ट्रात कोठेही नाही. यासह इतर उदघाटनासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागा. खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, महेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, माजी नगरसेवक सत्यजीत कदम, विजय जाधव आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनी आभार मानले.

‘तपोवन’वर १५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावातपोवन मैदानावर १५ हजार खुर्च्या लावणार आहेत. भाजपने ३, तर शिंदेसेनेने २ हजार कार्यकर्ते आणावेत. राष्ट्रवादी काँग्रेस १० हजार कार्यकर्ते आणेल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.विकासकामे सांगताना दम लागतोयगेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी कोल्हापुरात आला. ही कामे सांगताना दम लागतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत हीच कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

आरोग्य सेवेत मुश्रीफ यांचे नावदिवंगत नेते दिग्विजय खानवलिकर यांनी ‘सीपीआर’च्या माध्यमातून कोल्हापुरात चांगले काम केले. त्यांच्या पाठोपाठ आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव घेतले जाईल, असे महेश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती