रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:03 IST2025-10-30T17:02:56+5:302025-10-30T17:03:17+5:30
उन्हाळ्यात पावसाळा असे वातावरणात बदल होत आहे. गेली पाच महिने जिल्ह्यात पाऊस राहिल्याने त्याचा थेट परिणाम पिकांवर झाला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
राजाराम लोंढे
कोल्हापूर : रासायनिक खतांच्या दरात गेल्या नऊ वर्षांत ७५.८५ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकीकडे उसासह सर्व पिकांचा उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाला भाव मात्र त्या पटीत मिळत नाही. रासायनिक खताच्या किमतीत सरासरी ७५ टक्क्यांची वाढ झाली, पण उसाचा दर केवळ २२ टक्क्यांनीच वाढला आहे. हे शेतीचे अर्थकारण शेतकऱ्यांना आतबट्ट्धात आणत आहे.
उन्हाळ्यात पावसाळा असे वातावरणात बदल होत आहे. गेली पाच महिने जिल्ह्यात पाऊस राहिल्याने त्याचा थेट परिणाम पिकांवर झाला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अगोदरच वाढती मजूर, मशागतीच्या दरामुळे शेतकरी मेटाकुटीला भाला असताना रासायनिक खत कंपन्यांनी शेतकऱ्यांना पुन्हा झटका दिला आहे. गेल्या नऊ वर्षांत सर्वाधिक वाढ १२ : ६१
युरिया, डीएपीचे दर स्थिर, मात्र कृत्रिम टंचाई
युरिया आणि डीएपीचे दर स्थिर ठेवले आहेत. पण विक्रेत्यांकडे या खतांची टंचाई आहे. कृषी विभाग म्हणतो, ही खते मुबलक आहेत, मग ती नेमकी जातात कोठे? असा प्रश्नही शेतकरी विचारू लागले आहेत.
:०० च्या पोत्यामागे २७००, ००:५२:३४ च्या २१५०, १९: १९:१९ च्या १३०० व पोटॅशच्या किमतीत १२२० रुपयांची वाढ हझाली आहे.
अजूनही दरवाढीची शक्यता
केंद्र सरकारने रासायनिक खते नियंत्रणमुक्त केल्याने कंपन्यांनी दरवाढीचा धडाकाच लावला आहे. अजूनही दरवाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे. दरवाढीचे कारण मात्र विक्रेत्यांसह शेतकऱ्यांना समजलेले नाही.
५२ रुपये किलोचे खत; उसाला तीन रुपये भाव
रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने सरासरी ५२.५० रुपये किलो दर पडतो. महागडे खत घालून पिकविलेल्या उसाला मात्र तीन रुपये किलोने कारखान्यांना विकावा लागत आहे, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
रासायनिक खांच्या कंपन्यांची मनमानी सुरू असून, शेतकरी मेटाकुटीला आला आहे. एवढी महागडी खते घालून पिकविलेल्या उसाच्या दरासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही खरी शोकांतिका असून, युरियासह डीएपी मिळत नाही. याला लागलेल्या घुशी आम्हाला शोधाव्या लागतील.
- शिवाजी माने, अध्यक्ष, जयशिवराय
महागडी खते घेऊनही दर्जापुढे प्रश्नच
महागडी खते घालून उत्पादकता वाढेलच याची खात्री शेतकऱ्यांना नाही. भेसळयुक्त खताचा वापर केल्यानंतर उत्पादकता कशी वाढणार? शेतकरी हजारो रुपयांची खते आणून मातीत घालतात. मध्यंतरी जिल्ह्यात काही ठिकाणी बनावट खत विक्रीचे साठे सापडले होते. महागडी खते घेऊनही दर्जेदार खते मिळतात का? हे पाहणे गरजेचे आहे. एकीकडे उत्पादकता वाढेना आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्चा एवद्वाही दर मिळेना, अशा दुहेरी संकटात सध्या शेतकरी आहे.
पीक पालट नसल्याने उत्पादकता घटली
सातत्याने एकच पीक घेतल्याने जमिनीचा पोत कमी झाला आहे. शेणखत वापरण्याचे प्रमाण नगण्य असल्याने तसेच पाणी व रासायनिक खतांचा वापर वाढल्याने शेती नापीक होण्याचे प्रमाण वाढ असल्याचे चित्र.