शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आम्ही प्राध्यापक, पण टपरी चालवून करतो उदरनिर्वाह; सीएचबी प्राध्यापकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 13:09 IST

कोल्हापूर : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात सीएचबी प्राध्यापकांची अवस्था अत्यंत दयनीय असून, तूटपुंज्या वेतनावर घरातील खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा ...

कोल्हापूर : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात सीएचबी प्राध्यापकांची अवस्था अत्यंत दयनीय असून, तूटपुंज्या वेतनावर घरातील खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च भागत नसल्याने टपरी, वडापावचा गाडा, भाजीपाला, रंगकाम, गवंडीकाम करून उदरनिर्वाह करावा लागत असल्याची कैफियत सीएचबी प्राध्यापकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल पाठवून मांडली आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील हजारो सीएचबी प्राध्यापकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवून न्याय मागितला आहे.अल्प वेतन, तेही वेळेत नाही, प्राध्यापक भरती नाही यांसह विविध प्रश्न या प्राध्यापकांनी मेलद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविले आहेत. प्रत्येक वर्षी नऊ महिन्यांची ऑर्डर देऊन प्रत्यक्ष सात-साडेसात महिनेच दिले जातात. प्रत्येक वर्षी मुलाखत द्यावी लागते, वेळेत वेतन दिले जात नाही, तासाच्या मिनिटाचा घोळ अद्यापही सुरू आहे. प्रति तास ९०० रुपये असताना, प्रत्यक्ष ७२० रुपयेच दिले जातात. तूटपुंज्या वेतनावर घरातील खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च भागत नाही. त्यातच गणेशोत्सवाच्या सुट्टीतील आणि दिवाळी सुट्टीतील वेतन मिळत नाही. परीक्षेची कामे करूनही त्याचे वेतन दिले जात नाही.महाविद्यालयाची वेळ संपल्यावर बाहेर पडेल ती कामे करून घरातील अतिरिक्त खर्च भरून काढावा लागतो. कोण टपरी चालवतो, कोण वडापाव, भाजीपाला विकतो, तर कोण रंगकाम, गवंडी काम आणि छोटा-मोठा व्यवसाय करतो. महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक सहकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून मान सन्मान मिळत नसल्याची खंत या प्राध्यापकांनी ई-मेलमध्ये व्यक्त केली आहे.

या केल्या मागण्याऑर्डर ११ महिन्यांची द्या, प्रति महिना ५० हजार ठोक वेतन द्या.गणपती व दिवाळी सुट्टीतील वेतन कपात करू नका.मिनिटांचा घोळ समाप्त करा, प्रत्येक वर्षी मुलाखत न घेता फक्त रिक्त जागांची मुलाखत घ्या, प्राध्यापक भरतीच्या वेळी मोठा आर्थिक व्यवहार असतो, त्यावर नियंत्रण आणा, अशा मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीProfessorप्राध्यापक