Kolhapur News: अल्पवयीन मुलीचा पाठलाग, घरात घुसून केली पालकांना मारहाण; तरुणासह दहाजणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 13:22 IST2023-03-27T13:22:07+5:302023-03-27T13:22:54+5:30

माझ्याशी प्रेम कर, अन्यथा घरातील लोकांना जिवंत ठेवणार नाही', असा मोबाइलवर मेसेज पाठवत दिली धमकी

Chasing the minor girl, breaking into the house and beating the parents in kolhapur | Kolhapur News: अल्पवयीन मुलीचा पाठलाग, घरात घुसून केली पालकांना मारहाण; तरुणासह दहाजणांवर गुन्हा दाखल

Kolhapur News: अल्पवयीन मुलीचा पाठलाग, घरात घुसून केली पालकांना मारहाण; तरुणासह दहाजणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : 'माझ्याशी प्रेम कर, अन्यथा घरातील लोकांना जिवंत ठेवणार नाही', असा मोबाइलवर मेसेज पाठवत अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करणाऱ्या आणि तिच्या घरात घुसून पालकांना बेदम मारहाण करणाऱ्या तरुणासह नातेवाइकांनी मुलीच्या नागदेववाडी गावात शनिवारी रात्री हा प्रकार घडला.

नागदेववाडी येथील सोळा वर्षांच्या मुलीचा संशयित शंतनू निगडे सातत्याने पाठलाग करत असे. शनिवारी परीक्षेला जात असताना या मुलीचा त्याने दुचाकीवरून पाठलाग केला. माझ्यावर प्रेम कर, अन्यथा घरातील लोकांचे बरेवाईट करण्याची धमकी देणारे मेसेजही त्याने तिच्या मोबाइलवर पाठवले. हा प्रकार मुलीने घरात सांगताच पालकांनी त्याला जाब विचारला. याचा राग येऊन मुलाकडील नातेवाइकांनी रात्री मुलीच्या घरात घुसून पालकांना बेदम मारहाण केली. याबाबत मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी संशयित शंतनू सर्जेराव निगडे (वय २२) याच्यासह शहाजी रामचंद्र निगडे, सोहम शहाजी निगडे, संगीता शहाजी निगडे, अजिंक्य निगडे, सर्जेराव रामचंद्र निगडे, किरण दिवाकर निगडे, शोभा सर्जेराव निगडे, रेखा दिनकर निगडे, अनुराधा निगडे (सर्व रा. नागदेववाडी, ता. करवीर) या दहाजणांवर घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Chasing the minor girl, breaking into the house and beating the parents in kolhapur