शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पटसंख्येला आता बसणार ‘चाप’

By admin | Updated: July 20, 2015 00:23 IST

शिक्षण संस्थाचालकांवर नजर : सरल स्कूल डाटा बेस संगणक प्रणाली कार्यरत

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -शाळेतील बोगस पटसंख्या दाखवून शासकीय अनुदान लाटणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांना आता चाप बसणार आहे. कारण आता शिक्षक, विद्यार्थी, शाळा आणि कर्मचाऱ्यांची माहिती आॅनलाईन उपलब्ध होण्यासाठी ‘सरल स्कूल डाटा बेस’ ही संगणक प्रणाली राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रणालीमुळे शाळेची सर्व माहिती एका ‘क्लिक’वर मिळणार आहे. राज्य शिक्षण विभागाच्यावतीने ‘सिस्टेमॅटिक अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफर्म्स फॉर अचिव्हिंग लर्निंग बाय स्टुडंट’ म्हणजे सरल प्रणालीद्वारे शाळेची सर्व माहिती एकत्र करण्याचे काम सध्या सर्वत्र सुरू आहे. शाळांमधून विविध सांख्यिकीय माहितीची आवश्यकता असते. अशा माहितीची वारंवार मागणी केली जाते परंतु ही माहिती कागदोपत्री असल्यामुळे माहिती गोळा करणे आणि संकलित करण्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळे अध्ययन आणि अध्यापनासाठी पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत आहे. आवश्यकतेनुसार एकदाच माहिती भरावी लागणार असल्यामुळे पैसा आणि वेळेची बचत होणार आहे. त्याचबरोबर विविध शैक्षणिक संस्थांची नोंदणी करून सरकारच्या संकेतस्थळाशी या संस्था जोडली जाणार आहेत. या प्रणालीमुळे बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटणाऱ्या शिक्षणसंस्थाचालकांचे मात्र धाबे दणाणले आहे. अनुदान मिळविण्यासाठी बोगस पटसंख्या दाखविण्याचे अनेक प्रकार पुढे आले आहेत. या प्रणालीमुळे मात्र बोगस पटसंख्या दाखविणाऱ्यांवर आता आळा बसणार आहे. 'युआयडी'वरून माहिती भरली जाणार शाळेला मिळणारे अनुदान, त्याचा केलेला विनियोग, शाळेच्या समित्यांचा तपशील, सर्वंकष मूल्यमापन, विविध उपक्रम, मोफत साहित्य पुरवठा, वंचित गटातील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश, पोषण आहार योजना, भौतिक सुविधांची स्थिती, शैक्षणिक शुल्काची माहिती, शिष्यवृत्तींच्या लाभार्थ्यांची माहिती भरुन शिक्षण संस्थांची नोंदणी होणार आहे. मान्यताप्राप्त शाळांच्या युआयडी संकेतांकावरून माहिती भरली जाणार आहे. त्या शाळांना विशिष्ट कोड देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती संगणकावरत्यामध्ये शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे आधारकार्ड, रक्तगट, जन्मतारीख, वडिलांचे किंवा आईचे बँक खाते, यासह तो राहत असलेल्या घराचे गुगल मॅपिंग या अ‍ॅप्स्द्वारे त्याचे घर याबाबतची सविस्तर माहिती संगणकावर भरली जाणार आहेत. त्यामुळे बोगस पटसंख्या दाखविताच येणार नाही. शासन आदेशानुसार सरल प्रणालीद्वारे शहरातील सर्वच २७६ शाळांतील शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यासह सर्व गोष्टींची माहिती आॅनलाईन पद्धतीने घेण्याचे सुरू आहे. हे काम १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा उद्देश आहे.- डी. एस. तळप, समन्वयक, प्राथमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर