गणेश आगमनासाठी वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:55 AM2019-08-31T11:55:27+5:302019-08-31T11:58:43+5:30

गणेशोत्सवास सोमवारी (दि. २ सप्टेंबर) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्ग चालू, तर काही मार्ग एकेरी केले आहेत.

Changes in transport route for Ganesh arrival | गणेश आगमनासाठी वाहतूक मार्गात बदल

गणेश आगमनासाठी वाहतूक मार्गात बदल

Next
ठळक मुद्देगणेश आगमनासाठी वाहतूक मार्गात बदलवाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

कोल्हापूर : गणेशोत्सवास सोमवारी (दि. २ सप्टेंबर) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्ग चालू, तर काही मार्ग एकेरी केले आहेत.

गणेशमूर्ती नेण्यासाठी भाविक व सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते येणार असल्याने शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, तसेच गंगावेश या ठिकाणी काही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. पोलीस प्रशासनाने ठरविलेल्या ठिकाणी वाहनांचे पार्किंग करून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी केले आहे.

प्रवेश बंद केलेले मार्ग
शाहूपुरी कुंभार गल्ली (अत्यावश्यक सेवा आणि गणेशमूर्ती नेण्यासाठी आलेली वाहने सोडून), शाहूपुरी कुंभार गल्ली- नाईक अँड नाईक कंपनीसमोर. लक्ष्मीपुरी- रिलायन्स मॉल. शाहूपुरी- आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल. पार्वती टॉकीज ते गवत मंडई (दुचाकी वगळून सर्व वाहनांना प्रवेशबंदी)
बापट कॅम्प
शिरोली नाका ते बापट कॅम्प या मार्गावरील सर्व वाहनांना शिरोली येथे प्रवेश बंद.
पापाची तिकटी - कुंभार गल्ली
पापाची तिकटी ते बुरूड गल्ली मार्गावरील सर्व वाहनांना प्रवेश बंदी. शाहू उद्यान ते कुंभार गल्ली. पापाची तिकटी ते माळकर चौक वाहन उभे करण्यास बंदी.
पार्किंग व्यवस्था
शाहूपुरी चौथी आणि पाचवी गल्ली रस्त्याच्या कडेला. लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी भागांतील घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी आलेल्यांनी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदान येथे वाहने पार्क करावीत.
प्रवासी वाहतूक रिक्षांना बंदी
पार्वती टॉकीज सिग्नल, रिलायन्स मॉल, शाहूपुरी- नाईक अँड नाईक कंपनी, गवत मंडई या ठिकाणांवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना बंदी.
-------------------
- एकनाथ

 

Web Title: Changes in transport route for Ganesh arrival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.