शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मी टोपी टाकली ती विश्वजितला बसली, चंद्रकांत पाटील यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 2:57 PM

'माझ्या पक्षात या म्हणून मी कुणाच्याही घरी निमंत्रण घेऊन गेलेलो नाही'

कोल्हापूर : मी टोपी फेकायचे काम केले, ती ज्यांना बसली. त्यांनीच त्याचा खुलासा केला, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना शुक्रवारी लगावला.  प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे पक्षाच्या वतीने दसरा चौकात जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "माझ्या पक्षात या म्हणून मी कुणाच्याही घरी निमंत्रण घेऊन गेलेलो नाही. दोन्ही काँग्रेसची मंडळी अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यांना तुम्ही थांबवा. ज्यांना आपले काय होणार अशी भीती वाटते, असे लोक भाजपामध्ये येण्यास उत्सुक आहेत. हसन मुश्रीफ भाजपामध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे. अल्पसंख्याक समाजातील अत्यंत सहृदयी माणूस आहे. त्यांनी रुग्णसेवा प्रचंड केली आहे. राष्ट्रवादीत राहिले तर त्यांना भवितव्य नाही. कारण पाच वर्षे त्यांचे सरकार काय पुन्हा सत्तेत येणार नाही. तोपर्यंत ते म्हातारे होतील." याचबरोबर, मुळात मी महत्वाकांक्षी अजिबात नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष झालो म्हणून मुख्यमंत्री होतोच असेही काही नाही, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपात आला तर कुणाला आश्चर्य वाटायला नको, असे विधान भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटलांना टोला दोन दिवसांपूर्वी लगावला. चंद्रकांत पाटील यांचे विधान हास्यास्पद आहे. पाटील हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत. ते असे विधान का करतात हे त्यांनाच माहित आहे अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली. 

(काँग्रेसचे एक प्रदेश कार्याध्यक्ष लवकरच भाजपमध्ये येतील, चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट)

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर