शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
3
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
4
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
5
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
6
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
7
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
8
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
9
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
10
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
11
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
12
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
13
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
14
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
15
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
16
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
17
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
19
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
20
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन

Kolhapur Politics: नरके विरोधकच; ‘पी. एन’ गट म्हणूनच लढणार; राहुल पाटील यांची स्पष्टोक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:50 IST

सोमवारी सडोली खालसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये असला तरी ‘करवीर’मध्ये चंद्रदीप नरके हे आमचे पारंपरिक विरोधकच आहेत, आगामी सर्वच निवडणुका पी. एन. पाटील गट म्हणून लढणार असल्याची स्पष्टोक्ती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.राहुल पाटील म्हणाले, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी आयुष्य काँग्रेसमध्ये घातले. त्यांच्या पश्चात विशेषत: विधानसभा निवडणुकीनंतर प्रशासकीय पातळीवर कार्यकर्त्यांची कामे होईनात. ‘भोगावती’ साखर कारखान्याच्या कर्जाचे एक कारण असले तरी कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय थांबवून त्यांना बळ देण्याबरोबरच गट टिकवायचा झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाशिवाय पर्याय नव्हता. महायुतीमध्ये काही पक्ष असले तरी चंद्रदीप नरके हे आमचे पारंपरिक विरोधक आहेत, कोणत्याही परिस्थितीत २०२९ची विधानसभा मी लढणारच, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगूनच राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे.सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सडोली खालसा (ता. करवीर) येथे मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थित पी. एन. पाटील गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, ‘भोगावती’ अध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर, शंकरराव पाटील-वरणगेकर, शिवाजी कवठेकर, हंबीरराव पाटील, शिवाजी आडनाईक, विजय पाटील, प्रकाश मुगडे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

सतेज पाटील यांनी मदत केलीदिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या पश्चात विधानसभा निवडणुकीसह सर्वच ठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी मदत केली. त्यांच्या सोबत पक्षांतराबाबत चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ‘भोगावती’ कारखान्याच्या सत्तेतील माजी आमदार संपतराव पवार, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांचे समर्थन घेतले.

‘भाजप’शी कधीच चर्चा नव्हतीविधानसभा निवडणुकीनंतर आम्ही भाजपसोबत जाणार अशी चर्चा होती; पण आम्ही याबाबत भाजप नेतृत्वाशी कधीच चर्चा केली नाही.

राजीव गांधी जयंतीचा कार्यक्रम चालूच राहीलदिवंगत आमदार यांनी ३३ वर्षे राजीव गांधी जयंती साजरी केली. आमचा राजकीय निर्णय वेगळा असला तरी राजीव गांधी यांची जयंतीचा कार्यक्रम चालूच राहील.