शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

Chandgad vidhan sabha assembly election result 2024: चंदगडमध्ये भाजप'चे बंडखोर शिवाजीराव पाटील विजयी, राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 18:25 IST

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा पराभव

राम मगदूम गडहिंग्लज: चंदगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार शिवाजीराव पाटील हे २४ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी 'महायुती'तर्फे लढलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा पराभव केला. गेल्या १५ वर्षात बंडखोराला यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.'महायुती'चे उमेदवार आमदार पाटील विरुद्ध 'महाविकास आघाडी'तील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या डॉ.नंदिनी बाभूळकर-कुपेकर, 'भाजपा'चे बंडखोर शिवाजीराव पाटील, 'काँग्रेस'चे बंडखोर विनायक उर्फ पाटील, 'जनसुराज्य शक्ती पक्षा'चे मानसिंगराव खोराटे यांच्यातच पंचरंगी लढत झाली. मात्र, पहिल्यापासून शेवटच्या फेरीपर्यंत आमदार पाटील विरुद्ध शिवाजीराव पाटील यांच्यातच खरी लढत झाली.राज्य पातळीवरील धोरणाप्रमाणे 'महायुती'ची उमेदवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार पाटील यांनाच मिळाली. परंतु,त्यांच्याविरुद्ध शिवाजीराव पाटील यांनी बंडखोरी केली.तव्दत,'महायुती'चा घटक पक्ष राहिलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानेही मानसिंगराव खोराटे यांना उमेदवारी दिली.त्यामुळे आमदार पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील यांना माजी मंत्री भरमूअण्णा पाटील,भाजप चंदगड तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष संतोष तेली, शांताराम पाटील, रवींद्र बांदिवडेकर,अॅड.सुरेश माने,डी.एल.भादवणकर,अँड.विजय कडूकर,श्रीशैल नागराळ, चंदू किरमिटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिली.भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर, माजी जि.प.सदस्य अड.हेमंत कोलेकर यांनी युती धर्म पाळून आमदार पाटील यांना पाठिंबा दिला. तरीदेखील त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

फडणवीस यांचे निकटवर्तीय!नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील हे इनाम सावर्डे येथील शेतकरी कुटुंबातील असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. मुंबई येथील भाजपप्रणीत माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.भाजपच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले.

शिवाजीराव पाटील यांना २४,१३४ मतांची आघाडीउमेदवार- पक्ष - मिळालेली मते शिवाजीराव पाटील - भाजप बंडखोर - ८४,२५४-विजयीराजेश पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - (६०,१२०) डॉ.नंदिनी बाभूळकर-कुपेकर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- (४७,२५९)मानसिंग खोराटे - जनसुराज्य शक्ती पक्ष - २२१०७अप्पी पाटील - काँग्रेस बंडखोर - २४५८२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडBJPभाजपाMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024