शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावच्या मानस स्पोर्टसला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST

शहरातील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर गणेशचतुर्थीनिमित्त गणेश युनायटेड ट्रॉफी स्पर्धा पार पडली. स्पर्धेत बेळगाव, गारगोटीसह स्थानिक १६ संघांनी भाग ...

शहरातील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर गणेशचतुर्थीनिमित्त गणेश युनायटेड ट्रॉफी स्पर्धा पार पडली. स्पर्धेत बेळगाव, गारगोटीसह स्थानिक १६ संघांनी भाग घेतला. अंतिम दोन्ही संघ बेळगावचेच असल्याने सुरुवातीपासून सामना चुरशीने झाला. मानस स्पोर्टसच्या जय राऊतने धडाकेबाज चढाया करून बेळगावी एफसीवर दबाव ठेवला. मात्र, बेळगावीचा गोलरक्षक पार्थ, सुजल व वेदराज यांनी चढाया निष्फळ ठरविल्या.

निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने सामना टायब्रेकरवर झाला. यामध्ये मानसतर्फे जय राऊत, श्रेयस बासुरटेकर, जीत हरेर यांनी तर बेळगावीच्या शशांक, वेदिराज यांनी गोल केले. युनायटेडचे अध्यक्ष अरविंद बार्देस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण झाले. स्पर्धा समन्वयक ओंकार सुतारने स्वागत केले. सचिव दीपक कुपन्नावर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. प्र. सहायक निबंधक कौसर मुल्लाणी, आकाश पाटील, प्रशिक्षक गिरीष गणेशकर, मानस नायक, सफाज गोवेकर, सौरभ पाटील, ओंकार घुगरी, बाळासाहेब दळवी यांच्यासह क्रीडाप्रेमी व खेळाडू उपस्थित होते. हुल्लाप्पा सूर्यवंशी यांनी आभार मानले.

सर्वोत्कृष्ट खेळाडू

श्रेयस बासुरटेकर (गोलरक्षक मानस स्पोटर्स), बचावपटू : वैभव कोंडेकर (जय लिंगनूर), मध्यरक्षक : सुजल (बेळगावी), आघाडीपटू : जय राऊत (मानस)

-----------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या बेळगावच्या मानस स्पोर्टसला चषक देताना कौसर मुल्लाणी. शेजारी अरविंद बारदेस्कर, आकाश पाटील, गिरीष गणेशकर, मानस नायक, आदी उपस्थित होते. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : १३०९२०२१-गड-०१