शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा केंद्राचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 1:42 PM

pruthwirajpchavan, congressrally, kolhapurnews घाम गाळून पिकविलेल्या हक्काच्या शेतजमिनी तसेच उत्पादित शेतीमाल अंबानी, अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालून शेतकऱ्यांना गुलाम बनिवण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी येथे बोलताना केला. केंद्र सरकारच्या या कुटिल प्रयत्नाविरोधात शेतकरी, कामगार यांनी पेटून उठण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा केंद्राचा प्रयत्न. पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात प्रदेश कॉंग्रेस समितीच्यावतीने व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅली

कोल्हापूर : घाम गाळून पिकविलेल्या हक्काच्या शेतजमिनी तसेच उत्पादित शेतीमाल अंबानी, अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालून शेतकऱ्यांना गुलाम बनिवण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी येथे बोलताना केला. केंद्र सरकारच्या या कुटिल प्रयत्नाविरोधात शेतकरी, कामगार यांनी पेटून उठण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.प्रदेश कॉंग्रेस समितीच्यावतीने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीला चव्हाण मार्गदर्शन करत होते. राज्यभरातील कॉंग्रेस कार्यकर्ते या रॅलीत ऑनलाईन सहभागी झाले. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते संगमनेर, औरंगाबाद, नंदूरबार, नागपूर, कोल्हापूर, पालघर, अमरावती, ग्वाल्हेर येथून सहभागी झाले.कॉंग्रेस सरकारच्या काळात देशभरात शेतीमालाला किमान हमीभाव, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अन्नसुरक्षा अशी मोठी यंत्रणा उभी करण्यात आली, परंतु मोदी सरकारने ती उद्‌ध्वस्त करून शेतकऱ्यांचे वाटोळे केले. असा आरोपही चव्हाण यांनी केला. मोदींनी शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले, पण किती उत्पन्न वाढविले सांगायला तयार नाहीत.

उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ म्हणून सांगितले, पण सत्तेत येताच असा भाव देऊ शकत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. असे ते म्हणाले. शेतकरी, कामगार विरोधी कायदे मागे घेण्यासाठी व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.विकासाऐवजी विकण्याचे कामसत्तेवर येताना विकास करण्याचे आश्वासन दिले, पण सत्तेवर येताच विकासमधील ह्यसह्ण काढून टाकला आणि सहकार, शेती, बँका विकण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. कॉंग्रेसने देशातील पन्नास कोटी शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे काम केले, पण मोदी यांनी काळे कायदे करून एका रात्रीत रस्त्यावर आणले, असे पाटील म्हणाले.राज्यातील महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीची माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. शेती आणि शेतकऱ्यास वाचविण्याचे कॉंग्रेसने केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, समन्वय देवीदास भन्साळी उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर